व्वा! भन्नाटच... ब्रॉडनं घेतलेली ही विकेट 'मिस ना करना'

सुशांत जाधव
Monday, 20 July 2020

विंडीजच्या पहिल्या डावातील 84 व्या षटकात नवा चेंडू घेतल्यानंतर इंग्लंडच्या कर्णधाराने ब्रॉडच्या हाती चेंडू सोपवला.

England Vs West Indies 2nd Test: इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना मँन्चेस्टरच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार खेळ दाखवला. पहिल्या डावात 469 धावा केल्यानंतर इंग्लंड गोलंदांनीही कमालीची कामगिरी करुन दाखवली. यजमान गोलंदाजांचा सामना करताना विंडीजचा संघ पहिल्या डावात 287 धावांत आटोपला. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आणि  क्रिस वोक्स (Chris Woakes) यांनी प्रत्येकी 3-3 बळी टिपले.  पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजच्या विजयात मोलाचा वाट उचलणाऱ्या ब्लेकवुड (Jermaine Blackwood) ला स्टुअर्ट ब्रॉडने खातेही उघडू दिले नाही. स्टु्अर्टने घेतलेल्या या विकेटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.  ब्रॉडचा चेंडू बॅटच्या खालून जात  ब्लेकवुडचा त्रिफळा उडाला. हा चेंडू पाहून ब्लेकवुडही अवाक झाल्याचे पाहायला मिळाले. 

हार्दिक-नताशाच्या फोटोवर चहल-राहुल जोडीची 'लव्हली' रिअ‍ॅक्शन

विंडीजच्या पहिल्या डावातील  84 व्या षटकात नवा चेंडू घेतल्यानंतर इंग्लंडच्या कर्णधाराने ब्रॉडच्या हाती चेंडू सोपवला. ब्रॉडने टाकलेला चेंडू ब्लॅकवूडला समजला नाही. चेंडू सहज बॅटवर येतोय असा अंदाज ब्लॅकवूडने लावला. पण चेंडू खालीच राहिला अन् त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. चेंडू यष्टीवर आदळल्यानंतर ब्रॅकवूड खेळपट्टीकडे बघतच राहिला...इंग्लंडने दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून चौथ्या दिवसाअखेर त्यांनी 2 बाद 37 धावा करत 219 धावांची आघाडी घेतली आहे. बेन स्टोक्स 16 तर कर्णधार जो रुट 8 धावांवर खेळत आहेत. पाचव्या दिवसाच्या खेळात झटपट धावा करुन आश्वासक आव्हान विंडीजला देण्याच्या इराद्यानेच ही जोडी मैदानात उतरेल. अखेरच्या दिवशी खेळपट्टीने गोलंदाजांना साथ दिली तर इंग्लंडला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी मिळू शकते.  

धोनीनं खूप ट्रॉफ्या जिंकून दिल्या असल्या तरी... माझं मत दादालाच!

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून खेळाची मैदाने ओस पडल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. साउथहॅम्टनच्या मैदानात पाहुण्या विंडीजने यजमानांना पराभवाचा धक्का देत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या संघाने अखेरच्या दिवशी सामना जिंकण्यात यश मिळवले तर ते मालिकेत बरोबरी करतील.


​ ​

संबंधित बातम्या