आईनं कृष्णवर्णीयाशी लग्न केल्यानं तिच्या कुटुंबियांनी तोडलं होतं नातं; दिग्गज क्रिकेटर झाला भावूक

सुशांत जाधव
Friday, 10 July 2020

माझे आई-वडील कोणत्या परिस्थितीतून गेले आहेत हे मी अनुभवले आहे. हा क्षण माझ्यासाठी भावनिक असाच होता. माझ्या आईने  कृष्णवर्णीयाशी विवाह केल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिच्याकडे पाठ फिरवली. माझ्या आई-वडिलांनी या मुद्यावरुन खूप काही सहन केलंय.

लंडन : वर्णद्वेषाच्या मुद्यावरुन दमदार भाषण देणाऱ्या विंडीजच्या दिग्गज जलदगती गोलंदाजला आई-वडिलांसोबत झालेल्या घटना आठवल्याने अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी विंडीजचे दिग्गज गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी वर्णद्वेषाचा मुद्दा भयावह असल्याचे सांगत यासंदर्भात जगभरातील लोकांमध्ये जागृकता निर्माण करायला हवी, असे त्यांनी म्हटले होते. वर्णद्वेषासंदर्भातील मुद्यावर झंझावत भाषण दिल्यानंतर  या मुद्यावर स्काय न्यूजशी संवाद करत असताना ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

धोनी इन्स्टावर फक्त तिघांनाच करतो फॉलो

माझे आई-वडील कोणत्या परिस्थितीतून गेले आहेत हे मी अनुभवले आहे. हा क्षण माझ्यासाठी भावनिक असाच होता. माझ्या आईने  कृष्णवर्णीयाशी विवाह केल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिच्याकडे पाठ फिरवली. माझ्या आई-वडिलांनी या मुद्यावरुन खूप काही सहन केलंय. त्यामुळे माझ्यासाठी हा मुद्दा खूप जिव्हाळ्याचा आहे. आई-वडिलांसोबत घडलेली घटना आठवली की मी आजही भावनिक होता, असे म्हणत त्यांच्या डोळ्यातून अश्रू कोसळले. काही क्षणात लोकांची मानसिकता बदलणार नाही. त्याला खूप वेळ लागेल. पण याची सुरुवात झाली आहे. हळूहळू यात बदल होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अमेरिकेत आफ्रिकी वंशाच्या जॉर्ज फ्लायड याला पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. पोलिस अधिकाऱ्याने अमानवी कृत्याचा तो बळी ठरला. त्याच्या मृत्यूनंतर अमेरिकेसह जगभरात 'ब्लॅक लाईव्हज मॅटर' ही मोहिम उभारण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी वर्णद्वेषाविरोधात उभारलेल्या मोहिमेला पाठिंबा दर्शवला. सामना सुरु होण्यापूर्वी गुडघ्यावर बसून अमेरिकेतील घटनेचा निषेध करत वर्णभेदाच्या लढ्याला क्रिकेटर्संनी पाठिंबा दिला. अमेरिकेतील घटनेनंत क्रिकेटच्या मैदानातील प्रसिद्ध खेळांडूनी आपल्याला आलेले अनुभव शेअर करत या लढ्याला पाठिंबा दिला होता. क्रिस गेल, डॅरेन सॅमी यांनी या वर्ण द्वेषाच्या मुद्यावर भाष्य केले होते. 


​ ​

संबंधित बातम्या