क्रिकेट पंचांनीच केला नियमभंग स्मार्टवॉच घालून कॅटलबर्ग आले मैदानात...मग पुढे काय झाले ? 

शैलेश नागवेकर
Saturday, 15 August 2020

आसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कमिटीच्या नियमाचे उल्लंघन करण्यात आल्याचे आयसीसीने निदर्शनात आणून दिले. आयसीसीने त्यांना तंबी दिलीच, परंतु हा प्रकार अनावधानाने झाला असल्यामुळे कॅटलबर्ग यांच्यावर पुढील कारवाई न करण्याचे संकेत दिले.

लंडन : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात अनावधानाने स्मार्टवॉच घालून मैदानात आलेले पंच कॅटेलबर्ग यांना आयसीसीने तंबी दिली आहे. पंचांनाच नियमाची आठवण करुन देणारा प्रसंग प्रथमच क्रिकेटच्या मैदानावर घडला आहे. एजेस बाऊल येथे सुरू असलेल्या या कसोटी सामन्यात 47 वर्षीय पंच कॅटेलबर्ग दुसऱ्या दिवसाच्या खेळात पहिल्या सत्रात स्मार्टवॉच परिधानकरून मैदानात आले आयीसीसीच्या लक्षात ही घटना आली त्यांना त्याबाबत सांगण्यात आले, त्यानंतर उपाहारानंतर कॅटलबर्ग यांनी हे घड्याळ काढून ठेवले. 

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

आसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कमिटीच्या नियमाचे उल्लंघन करण्यात आल्याचे आयसीसीने निदर्शनात आणून दिले. आयसीसीने त्यांना तंबी दिलीच, परंतु हा प्रकार अनावधानाने झाला असल्यामुळे कॅटलबर्ग यांच्यावर पुढील कारवाई न करण्याचे संकेत दिले. स्मार्टवॉचसह संवाद साधू शकता येईल असे कोणतेही उपकरण मैदानावर किंवा ड्रेसिगरुमध्ये देण्यात आयसीसीने 2018 पासून बंदी केलेली आहे. देशांतर्गत कौंटी क्रिकेटचेही थेट प्रक्षेपण होत असल्याने इंग्लंड क्रिकेट मंडळाने मार्च महिन्यापासूनच आपल्या देशांतर्गत खेळाडूंनाही स्मार्टवॉच वापरावर बंदी केलेली आहे.  स्मार्चवॉच ही खेळाडूंसाठी अनिवार्य आहे स्मार्टवॉच लाचलुचपत प्रतिबंधक समितीच्या अधिकाऱ्यांकडे सूपूर्द करणे बंधनकारक असते. 

कॅरेबियन लीगच्या मागील हंगामातील किंगची फटकेबाजी (व्हिडिओ)

पाक खेळाडूकडूनही उल्लंघन 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मैदानावर स्मार्चवॉच घालून येण्याचा असा प्रसंग पहिल्यांचा घडलेला नाही. 2018 मध्ये पाकिस्तानचे खेळाडू स्मार्टवॉच घालून मैदानात आले होते. आमच्याकडून ही अनावधानाने चुक झाल्याचे त्या खेळाडूंनी आयसीसीला कळवून माफी मागितली होती.


​ ​

संबंधित बातम्या