'पॉझिटिव्ह'_ 20 गडयांसह पाकचा संघ इंग्लंडला रवाना

टीम ई-सकाळ
Sunday, 28 June 2020

इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानचा संघ प्रत्येकी तीन कसोटी आणि ट्‌वेन्टी- २० मालिका खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर निघण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच पाकिस्तान क्रिकेट संघातील दहा खेळाडू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली होती

इस्लामाबाद : कोरोना विषाणूच्या महासाथीच्या रोगामुळे क्रिडा क्षेत्रावर अभूतपूर्व संकट कोसळले आहे. त्यानंतर या संकटातून सावरुन क्रिकेट जगतातील खेळाडू पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज होत आहेत. काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेस लवकरच सुरवात होणार आहे. त्यानंतर आज पाकिस्तानचा क्रिकेट संघ देखील इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झालाय.  इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानचा संघ प्रत्येकी तीन कसोटी आणि ट्‌वेन्टी- २० मालिका खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर निघण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच पाकिस्तान क्रिकेट संघातील दहा खेळाडू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली होती. परंतु चाचणीत गडबड असल्याचे बाधित झालेल्या महम्मद हफिझने उघड केले होते.

शोएबनं सानियाच्या डोळ्यादेखत केल माहिराशी फ्लर्ट; मग काय चर्चा तर होणारच

पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून घेण्यात आलेल्या  कोरोना चाचणीत मोहम्मद हफीझ पॉझिटिव्ह ठरला होता; मात्र त्यानंतर कुटुंबासह दुसरी चाचणी केल्यावर, त्यात तो आणि त्याची पत्नी निगेटिव्ह आले होते. त्यामुळे एकाच दिवसात वेगवेगळा अहवाल आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत होते. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा या दहा खेळाडूंची कोरोना चाचणी घेतली होती. या चाचणीत दहा पैकी सहा खेळाडूंचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले होते. यामध्ये शादाब खान, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान, फखर झमान आणि वहाब रियाज यांचे खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. तर हैदर अली, हारीस रौफ, काशिफ भट्टी आणि इमरान खान या चार खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे पाक क्रिकेट मंडळाने जाहीर केले होते. मात्र यामुळे पाकिस्तानच्या आगामी इंग्लंड दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर पाक क्रिकेट मंडळाने नियोजित इंग्लंड दौऱ्यासाठी उर्वरित खेळाडूंना पाठविणार असल्याचे म्हटले होते.  

जिममध्ये जायचय? अगोदर हे वाचा

त्यानंतर आज पाकिस्तान क्रिकेट संघातील या दहा खेळाडूंव्यतिरिक्त इतर सर्व २० खेळाडू इंग्लंडबरोबरच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. ज्यामध्ये अझर अली (कसोटी कर्णधार), बाबर आझम (टी-२० कर्णधार), आबिद अली, इमाम-उल-हक, शान मसूद, असद शफीक, फवाद आलम, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, सरफराज अहमद, फहीम अशरफ, मोहम्मद अब्बास, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, सोहेल खान, उस्मान शिंवरी, इमाद वसीम,  यासिर शाह, रोहेल नाझीर आणि मुसा खान या खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंडमध्ये गेल्यावरही या सर्व खेळाडूंचे विलगीकरण केले जाणार असल्याचे पाक मंडळाने सांगितले आहे.


​ ​

संबंधित बातम्या