Eng Vs Pak: पाक फलंदाजाला आगाऊपणा नडला; पाहा Video

सुशांत जाधव
Friday, 14 August 2020

तिसऱ्या पंचांनी त्याला बाद ठरवले अन् रिव्यू इंग्लंडचा रिव्यू यशस्वी ठरला.  

England Vs Pakistan: इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना (Eng Vs Pak 2nd Test)  साउथहॅम्टनच्या मैदानात सुरु आहे. पहिल्या सामना गमावलेल्या पाकिस्तानी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कर्णधाराचा हा निर्णय फलंदाजांनी फोल ठरवला. पहिल्या दिवसाअखेर  अवघ्या 126 धावांत पाकचा अर्धा संघ तंबूत परतला होता. इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर पाकचे आघाडीचे गडी पुन्हा एकदा हतबल दिसले. (पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावाप्रमाणेच) यात क्रिस वोक्सने  फवाद आलमला तंबूत धाडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

गुगल सर्चमध्येही कोहली आघाडीवर; स्मृति मानधनाही ठरली लक्षवेधी

पाकिस्तान संघाने 117 धावांवर  4 विकेट गमावल्यानंतर  फवाद आलम (Fawad Alam) मैदानात उतरला. क्रिस वोक्स (Chris Woakes) च्या गोलंदाजीवर तो क्रिजमध्ये अजब-गजब पद्धतीने खेळताना दिसला. सामान्यता गोलंदाजाने स्ट्राइक घेतल्यानंतर फलंदाज बॅट जमीनीवर ठेवत असतात. मात्र फवाद आलम उभे राहिल्याचे पाहायला मिळाले. वोक्सने चेंडू फेकल्यानंतर तो यष्टिच्या आडवा आला. यावर वोक्सने पायचितची जोरदार अपील केली. पंचांनी नकार दिल्यानंतर जो रुटने रिव्यू घेतला. चेंडू मधल्या यष्टीचा वेध घेत असल्याचे रिप्लायमध्ये दिसले. तिसऱ्या पंचांनी त्याला बाद ठरवले अन् रिव्यू इंग्लंडचा रिव्यू यशस्वी ठरला.  

वाचा धोनी कधीपर्यंत आयपीएल खेळणार

तत्पूर्वी जिम्मी अँडरसनने पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या शान मसूदला अवघ्या 14 धावांवर बाद केले. धावफलकावर 6 धावा असताना पाकने पहिला गडी गमावला. मागील 12 डावात 139 धावा करणारा पाक कर्णधार 20 धावा करुन मागे फिरला. पावसामुळे काहीकाळ खेळ थांबला. बाबर आझमच्या साथीने अबीद अलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 60 धावा केल्या. ही जोडी सेट होतेय असं चित्र दिसत असताना सॅम करनने त्याला तंबूत धाडले. त्याची जागा घेण्यासाठी आलेला असद शफिक 5 धावा करुन माघारी फिरला. फवाद आलम चार चेंडू खेळून अजब-गजब प्रकारे बाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. 
 


​ ​

संबंधित बातम्या