बुंदेसलीगा स्पर्धेला मोठा झटका, ड्रेसडेन संघ 14 दिवसांसाठी क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

जर्मनीच्या चँन्सेलर एँजेला मार्केल सरकारने 16 मे पासून जर्मन फुटबॉल लीग खेळण्यास परवानगी दिली होती.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा आयोजन रद्द करण्यात आले आहेत. काही देशांमध्ये खेळ आयोजन पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, युरोपमध्ये बार्सिलोना सहीत इतर क्लबकडून फुटबॉल सरावास सुरुवात  देखील करण्यात आली आहे. तसेच दक्षिण कोरियामध्ये के-लीग या फुटबॉल सामने प्रेक्षकांविना खेळण्यात येत आहे. जर्मनीत मात्र संघातील दोन खेळाडूंना कोरोना झाल्याने संपुर्ण संघाला क्वारंटाईन करावे लागले आहे

बुंदेसलीगा ही फुटबॉल लीग खेळण्यास काही अठवड्यांचा वेळ शिल्लक असताना खेळ आयोजने पुन्हा सुरु होण्यच्या शक्यतेस मोठा धक्का बसला आहे. स्पर्धेतील डायनामो ड्रेसडेन क्लब मधील आणखी दोन कोरोना रुग्ण सापडल्याने संपुर्ण संघाला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघाला क्वारंटाईन करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला आहे, यामुळे डायनामो ड्रेसडेन हा संघ पुढच्या आठव्यात हनोवर विरोधात होणा सामना खेळू शकणार नाही. 

"फुटबॉल चाहत्यांसाठी खुशखबर, मेसीसह बार्सिलोना खेळाडूंचा सराव सुरु"

जर्मनीच्या चँन्सेलर एँजेला मार्केल सरकारने 16 मे पासून जर्मन फुटबॉल लीग खेळण्यास परवानगी दिली होती. क्लबचे निर्देशक राल्फ मिंगे यांनी सांगीतले की,‘ मागच्या काही आठवड्यांपासून आम्हा सर्व प्रकारचा काळजी घेण्याचा प्रयत्न करत होतो पण आता आम्हा पुढचे 14 दिवस सराव करु शकणार नाहीत.”  पुढच्या 14 दिवसांसाठी खेळाडू सराव करु शकणार नाहीत त्यासोबतच त्यांचे नियोजित सामनेदेखील खेळू शकणार नाही. संघातील खेळाडूंसोबतच अन्य स्टाफ देखील क्वारंटाईन करण्याचा निर्णय क्लबकडून घेण्यात आला आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या