11.32 सेकंदाची वेगवान वेळ नोंदवत द्युती चंदने पटकाविले सुवर्णपदक 

वृत्तसंस्था
Wednesday, 10 July 2019

नॅपोली (इटली) येथे सुरू असलेल्या विश्‍व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताच्या द्युती चंदने महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविला.

नागपूर : नॅपोली (इटली) येथे सुरू असलेल्या विश्‍व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताच्या द्युती चंदने महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविला. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ऍथलिट्‌ ठरली. ऑलिंपिकनंतरची ही दुसरी मोठी स्पर्धा मानल्या जाते. त्यामुळे द्युती चंदच्या सुवर्णपदकाला विशेष महत्त्व आहे. या स्पर्धेत नागपूरच्या तीन खेळाडू सहभागी झाल्या आहेत. 

आपले समलिंगी संबंध असल्याचे जाहीरपणे सांगणारी ओडिशाची द्युती चंद स्पर्धेतील उद्‌घाटन सोहळ्यात भारताची ध्वजधारक होती. तिने अंतिम शर्यतीत 11.32 सेकंदांची वेगवान वेळ दिली आणि सुवर्णपदक जिंकले. स्पर्धेच्या इतिहासातील भारताचे हे एकूण दुसरे सुवर्णपदक होय. यापूर्वी गोळाफेकपटू इंदरजित सिंगने 2015 च्या स्पर्धेत सुवर्ण तर 13 च्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. दोन वर्षांपूर्वी तायपई येथे नाशिकच्या संजीवनी जाधवने दहा हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते.

संबंधित बातम्या