ब्राँझ पदक विजेत्या भारतीय खेळाडूची प्रकृती बिघडली

वृत्तसंस्था
Friday, 24 August 2018

आशियाई स्पर्धेत ब्रॉंझ पदक पटकावणाऱ्या भारताच्या दुष्यंत चौधरीची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला पदक प्रदान सोहळ्यानंतर स्ट्रेचरवरुन नेण्यात आले. 

जकार्ता : आशियाई स्पर्धेत ब्रॉंझ पदक पटकावणाऱ्या भारताच्या दुष्यंत चौधरीची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला पदक प्रदान सोहळ्यानंतर स्ट्रेचरवरुन नेण्यात आले. 

दुष्यंतने आज सकाळी (24 ऑगस्ट) लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात सात मिनिटे आणि 18.76 सेकंद अशी वेळ नोंदवत ब्रॉंझपदक पटकावले. मात्र स्पर्धेनंतर त्याची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे त्यालाउपचारासाठी स्ट्रेचरवरुन नेण्यात आले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता. पदक स्वीकारल्यानंतर त्याला प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. 

दुष्यंतने 2014च्या आशियाई स्पर्धेतही याच क्रीडा प्रकारात ब्रॉंझ पदक पटकावले होते. यावेळी मात्र त्याने आपल्या वेळेत सुधारणा केली आहे. मागील आशियाई स्पर्धेत त्याने सात मिनिटे आणि 26.27 सेकंदाची वेळ नोंदवली होती.   


​ ​

संबंधित बातम्या