पाक क्रिकेट संघाच्या मदतीसाठी धावून आला शाहिद आफ्रिदी ; वाचा काय आहे कारण     

टीम ई-सकाळ
Thursday, 9 July 2020

पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळासमोर एक नवे आव्हान आले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाला सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रायोजक स्पॉन्सरर मिळालेला नाही.

कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन नंतर तब्बल तीन ते चार महिन्यांनी क्रीडा क्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. क्रिकेट जगतातील स्थिती देखील पुढील काही दिवसांमध्ये सामान्य होऊन, पूर्वीप्रमाणे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे. अशातच पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाची (पीसीबी) आर्थिक स्थिती अतिशय खराब झाली आहे. आणि आता याला कारण ठरले आहे ते म्हणजे पाकिस्तान क्रिकेट संघाला प्रायोजक मिळालेला नाही. त्यामुळे या प्रसंगी पाकिस्तानचाच माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी पाकिस्तान संघाच्या मदतीसाठी धावून आलेला आहे. 

कोरोनानंतर 'या' गोलंदाजाने घेतली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट 

कोरोना नंतर क्रिकेट जगत देखील पुन्हा सुरु होत असल्याने, प्रत्येक देशातील क्रिकेट मंडळाने आपल्या आगामी सामन्यांसाठीचे आयोजन सुरु केले आहे. त्यामुळे खेळाडू पुन्हा मैदानावर येत असल्याचे चित्र आहे. पाकिस्तानचा संघ देखील आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झालेला असून, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या मालिकेनंतर प्रत्येकी तीन कसोटी आणि टी-20 सामने पाकिस्तान खेळणार आहे. मात्र त्यापूर्वीच पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळासमोर एक नवे आव्हान आले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाला सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रायोजक स्पॉन्सरर मिळालेला नाही. तर यापूर्वी असणाऱ्या प्रायोजक स्पॉन्सरर बरोबरचा करार संपलेला आहे. तसेच पूर्वीचे क्रिकेट संघाचे प्रायोजक स्पॉन्सरर हे पहिल्यापेक्षा कमी मूल्य देत असल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नवीन प्रायोजक स्पॉन्सरर मिळू शकलेला नाही. 

 

त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चांगलेच अडचणीत सापडले असताना माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट संघाला मदतीचा आधार दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाला कोणताच प्रायोजक स्पॉन्सरर मिळाला नसल्यामुळे शाहिद आफ्रिदीने त्याच्या सामाजिक संस्थेचा चॅरिटी पार्टनर म्हणून पाकिस्तान क्रिकेट मंडळासोबत करार केलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा क्रिकेट संघ आता शाहिद आफ्रिदी फाउंडेशनचा लोगो असलेला जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. शाहिद आफ्रिदीने सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली असून, या ट्विट मध्ये शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या किट्स वर शाहिद आफ्रिदी फाउंडेशनचा लोगो पहाताना आनंद होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेट संघाला शुभेच्छा देत, आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट मंडळासोबत चॅरिटी पार्टनर असल्याचे म्हटले आहे.      

 


​ ​

संबंधित बातम्या