कोरोनामुळे आयपीएल रद्द होण्याच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 March 2020

बीसीसीआयने या आधी सर्व संघाच्या मालकांसोबतची बैठक देखील रद्द केली होती.

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता सगळ्या क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात येत आहेत. या वर्षात नियोजित असलेली टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा पुढच्या वर्षी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेच भारतात इंडीयन प्रीमिअऱ लीग (आयपीएल) सोबत होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देश 21 लॉक डाऊन करण्यात आला आहे, त्यामुळे आयपीएल च्या आयोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारा क्रिकेटपटू करतोय हे काम

 बीसीसीआय कडून आयपीएल चे आयोजन 15 एप्रिल पर्यंत स्थगीत करण्यात आले होते. देशातील परिस्थीती सुधारली तरच स्पर्धेच्या आयोजनाचा विचार करण्यात येईल असे बीसीसीआयने सांगीतले होते. त्यांनंतर भारतात कोरोना व्हायरस जास्तच पसरला आहे. देशात रुग्णांची संख्या 500 च्या पुढे गेली आहे. अशा गंभीर परिस्थीतीत माझ्यकडे कुठलाही पर्याय नसल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना सांगीतले होते.

टोक्यो ऑलिम्पिक २०२० अखेर लांबणीवर!

किंग्स एलेवन पंजाबया संघाचे मालक नेस वाडीया यांनी आयपीएलच्या आयोजनाबद्दल स्पष्ट मत मांडले आहे, त्यांनी सांगीतले की, ‘बीसीसीआयने आयपीयल स्थगीत करण्याचा विचार करायला हवा, कारण जरी का देशातील स्थीती मे पर्यंत सुधाररली तरी देखील आपल्याकडे पुरेसा वेळ नसेस, त्याबरोबरच परदेशीतील खेळाडूना भारतात प्रवेश करण्याची परवाणगी मीळेल का, हे निश्चीत नाही.’

सचिन म्हणतोय ‘उभारा घरी राहण्याच्या दृढ संकल्पाची गुढी’

बीसीसीआयने या आधी सर्व संघाच्या मालकांसोबतची बैठक देखील रद्द केली होती. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगीतले की, ‘जर ऑलिम्पिक एक वर्षाने पुढे ढकलण्यात येत असेल तर आयपीएल ही तर तुलनेने खूप लहान स्पर्धा आहे, आयपीएलच्या आयोजनात खूप अडचणी येत आहेत. सरकार विदेशी वीजा देण्याचा विचार देखील करत नाही.’ देशातील परीस्थीती पहता आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्यासाठी दबाव वाढत आहे


​ ​

संबंधित बातम्या