कोरोनामुळे आता बुद्धिबळ जगतातील 'ही' स्पर्धा स्थगित    

टीम ई-सकाळ
Monday, 29 June 2020

कोरोनाच्या महामारीमुळे क्रीडा जगतावर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे अनेक क्रीडा संघटनांनी यावर्षी होणाऱ्या स्पर्धा पुढे ढकलण्याचा अथवा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला आहे.

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील यंदाची विश्व चॅम्पियनशिप टूर्नामेंट कोरोनाच्या संकटामुळे स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे क्रीडा जगतावर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे अनेक क्रीडा संघटनांनी यावर्षी होणाऱ्या स्पर्धा पुढे ढकलण्याचा अथवा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला आहे. त्यानंतर आता जागतिक बुद्धिबळ खेळातील सर्वोच्च संस्था फिडे ने यावर्षीच्या अखेरीस डिसेंबर मध्ये आयोजित विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा 20 डिसेंबर रोजी बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धा दुबई येथे खेळवण्यात येणार होती. यावेळेस सध्याचा नॉर्वेचा विश्व विजेता मॅग्नस कार्लसनचा सामना कॅन्डीडेट्स स्पर्धेतील विजेत्यासोबत होणार होता. तर मार्च महिन्यातील रशिया मध्ये कॅन्डीडेट्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा मधेच स्थगित करण्याची नामुष्की आयोजकांवर आली होती.        

क्रिकेटच्या मैदानातील 'हे' लाजिरवाणे रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहेत का ?             

त्यामुळे फिडे चे प्रमुख इमिल सुतोवस्की यांनी, उर्वरित कॅन्डीडेट्स स्पर्धेचे आयोजन यावर्षीच्या अखेरीस घेण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यंदाची विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा पुढे ढकलण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढच्या वर्षी 2021 मध्ये विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा मार्च महिन्यात किंवा ऑक्टोबर मध्ये घेण्याचा विचार असल्याचे इमिल सुतोवस्की यांनी सांगितले आहे.        

मास्टर ब्लास्टरची विकेट घेतल्यामुळे 'या' खेळाडूला मिळाले होते गिफ्ट  

यावर्षीच्या दुबई एक्सपो दरम्यान विश्व बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात येणार होती. पण कोरोनाच्या उद्रेकामुळे दुबई एक्सपोचे आयोजन देखील काही दिवसांपूर्वी पुढे ढकलण्यात आले आहे. 1 ऑक्टोबर 2021 रोजी दुबई एक्सपोचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.         

 


​ ​

संबंधित बातम्या