INDvAFG : एक्स्ट्रा टाईमनं भारताला तारलं; डॉंजेलचा गोलमुळे बरोबरीचा दिलासा!

वृत्तसंस्था
Thursday, 14 November 2019

ब्रॅंडन फर्नांडिसने अगदी मोक्‍याच्या वेळी मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर सुरेख किक दिली आणि डॉंजेलने उडी मारत हेडरद्वारे चेंडूला जाळीची दिशा दिली. 

दुशानबे (ताजिकीस्तान) : भारताला विश्‍वकरंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेत आणखी एका बरोबरीवर समाधान मानावे लागले. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात गुरुवारी (ता.14) लेन डॉंजेल याने सामन्याच्या भरपाई वेळेत केलेल्या गोलमुळे भारताला हा सामना 1-1 असा बरोबरीत रोखता आला. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

विश्‍वकरंडक फुटबॉल पात्रता फेरीतील या आणखी एका बरोबरीमुळे भारताला 'ई' गटात चार सामन्यातून दोन गुणांसह चौथ्या स्थानावर कायम राहावे लागले आहे. भारताला पात्रता फेरीत अजून विजय मिळालेला नाही. अर्थात, त्यांचे आव्हान संपल्यात मानता येणार नाही. त्यांचा पुढील सामना ओमानविरुद्ध होणार असून, या अवे सामन्यात त्यांना विजय आवश्‍यक असेल. दुसरीकडे अफगाणिस्तान संघाने चारा सामन्यातील चार गुणांसह तिसरे स्थान कायम राखले आहे. 

सामन्याच्या भरपाई वेळेत 93व्या मिनिटाला लेन डॉंजेल याने भारतासाठी महत्वपूर्ण गोल केला. एफसी गोवा संघाकडून खेळणाऱ्या डॉंजेलने आपल्या संघाच्या सराव मैदानावर ही कामगिरी केली. ब्रॅंडन फर्नांडिसने अगदी मोक्‍याच्या वेळी मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर सुरेख किक दिली आणि डॉंजेलने उडी मारत हेडरद्वारे चेंडूला जाळीची दिशा दिली. 

- स्पेनच्या विश्वविजेत्या डेव्हिड व्हिलाची फुटबॉलमधून निवृत्ती

भारताने जरूर विजयाच्या इराद्याने या सामन्याला सुरवात केली. मात्र, अफगाणिस्तानने सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळविले. भारतीय संघाला त्यांनी सतत दडपणाखाली ठेवले. भारताच्या उदांता, आशिकी, सहाल आणि कर्णधार सुनील छेत्री यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण, त्यांना गोल करण्याच्या फार काही संधी निर्माण करता आल्या नाहीत. अनेकदा आशिकीचा वेग भारतासाठी अडचणीचा ठरला.

- INDvsBAN : प्रतिस्पर्धी कोणीही असो हुकूमत फक्त भारतीय वेगवान गोलंदाजांचीच!

सामन्याच्या पूर्वार्धातील अतिरिक्त वेळेत 46व्या मिनिटाला अफगाणिस्तानने खाते उघडले. त्या वेळी डेव्हिड नाजेम याचा सुरेख पास झेल्फी नरझारी याने सत्कारणी लावला. त्याने चेंडूला अचूक जाळीची दिशा दिली. भारताचा गोलरक्षक गुरप्रितसिंगने गोल वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याची झेप अपुरी पडली. 

- IPL 2020 : केदारसह या दोन प्रमुख खेळाडूंना चेन्नई देणार डच्चू

भारतीय प्रशिक्षक स्टिमॅक यांनी उत्तरार्धात तीन बदल केले. फरुख चौधरी, मनवीर सिंग आणि सेईमिनलेन डॉंजेल यांना त्यांनी उतरवले. त्यांच्या आक्रमणामुळे एकवेळ अफगाणिस्तानची बचावफळी दडपणाखाली आली. त्यातच सुनील छेत्रीचे दोन प्रयत्न पंचांनी नाकारल्यामुळे भारताच्या खेळावर मर्यादा आल्या. त्यानंतरही भारताचे प्रयत्न चालू राहिले. त्याला अखेर अतिरिक्त वेळेत यश आले.


​ ​

संबंधित बातम्या