इंग्लंडच्या 1000 व्या कसोटीत ट्रम्प, किमचे 'हँडशेक'

वृत्तसंस्था
Saturday, 4 August 2018

बर्मिंगहम : एजबस्टन कसोटी सामन्याचे तीनही दिवस अत्यंत रोमांचक झाले. अश्विनचे चार बळी, विराट कोहलीचे शतक, सॅम करनची उत्तम गोलंदाजी, ज्यो रूट आणि कोहलीमधील द्वंद, इशांत शर्माचे पाच बळी या सर्व घटनांमुळे भारत आणि इंग्लंडच्या चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. दोन्ही संघाचे चाहते आपापल्या संघाला अत्यंत उत्स्फुर्तपणे पाठिंबा देत असतानाच डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

इंग्लंडमध्ये मुख्यत: कसोटी सामन्यांमध्ये अतिशय शिस्तबद्ध प्रेक्षक असतात. यावेळी मात्र एजबस्टन स्टेडियमधील प्रेक्षकांमध्येच 'फॅन्सी ड्रेस स्पर्धा' रंगली होती. यामध्ये एकाने उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांचा मास्क लावून त्यांच्यासारखाच पेहराव केला होता, तर एका प्रेक्षकाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा पेहराव केला होता. 

कॅमेराने दोघांनाही टिपल्यावर कॉमेंट्री बॉक्समध्ये एकच हशा पिकला. या दोघांनीही एकमेकांना पाहिल्यावर हस्तांदलोन केले. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भेटीत ट्रम्प आमि किम यांनी केलेल्या हस्तांदलोनाची प्रचंड चर्चा झाली होती आणि आता इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी दरम्यान झालेल्या या हस्तांदलोनाची चर्चा होत आहे.

संबंधित बातम्या