क्रिकेटच्या मैदानातील 'हे' लाजिरवाणे रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहेत का ? 

टीम ई-सकाळ
Monday, 29 June 2020

क्रिकेट मध्ये देखील आजपर्यंत अनेक खेळाडूंनी नवनवे रेकॉर्ड बनवत इतिहास रचला आहे. मात्र त्यामध्ये असेही काही नकळत घडलेले रेकॉर्ड आहेत, जे खेळाडू स्वतः देखील लक्षात ठेवू इच्छित नाहीत. अशा  रेकॉर्डची चर्चा झाल्यास या खेळाडूंना देखील त्याचे वाईट वाटते.                

क्रीडा क्षेत्रातील एकाद्या खेळाडूची ओळख ही नेहमीच त्याने केलेल्या कामगिरीच्या बळावर होत असते. संबंधित खेळाडूने बनवलेले रेकॉर्ड याची चर्चा अनेकदा होत असते. क्रिकेट क्षेत्रासह सर्वच खेळातील चर्चा ही सर्वाधिक सामन्यांच्या दरम्यान, कोणते नवे रेकॉर्ड प्रस्थापित झाले आणि त्यासाठी कोणत्या खेळाडूने आपले योगदान दिले यावर होत असते. क्रिकेट मध्ये देखील आजपर्यंत अनेक खेळाडूंनी नवनवे रेकॉर्ड बनवत इतिहास रचला आहे. मात्र त्यामध्ये असेही काही नकळत घडलेले रेकॉर्ड आहेत, जे खेळाडू स्वतः देखील लक्षात ठेवू इच्छित नाहीत. अशा  रेकॉर्डची चर्चा झाल्यास या खेळाडूंना देखील त्याचे वाईट वाटते.                

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड -  
क्रिकेटच्या एकदिवसीय प्रकारात सलामीवीर म्हणून अतिजलद फलंदाजी करण्यासाठी श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील सनथ जयसूर्याला ओळखले जाते. सनथ जयसूर्याने फक्त १७ चेंडू मध्ये अर्धशतक नोंदवले होते. तर ३०० पेक्षा अधिक एकदिवसीय सामन्यांमध्ये १० हजार पेक्षा अधिक धावा सनथ जयसूर्याने केल्या आहेत. मात्र एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड देखील सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. एकदिवसीय करियर मध्ये सनथ जयसूर्याने 34 वेळा शून्य धावा केल्या आहेत. यानंतर हाच रेकॉर्ड पाकिस्तान क्रिकेट संघाच्या शाहिद आफ्रिदीवर आहे. शाहिद आफ्रिदी 30 वेळा शून्यावर बाद झाला आहे.   

ब्रिट्स टेनिस स्पर्धेतून अँडी मरेची माघार                        

कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा बोल्ड आउट होण्याचा रेकॉर्ड -  
भारतीय क्रिकेट संघातील 'वॉल' म्हणून राहुल द्रविडची ओळख आहे. त्यातल्या त्यात कसोटी सामन्यांमध्ये राहुल द्रविडने फलंदाजी करताना अनेक प्रतिस्पर्धी खेळाडूंना चांगलाच घाम फोडला. मात्र असाच एक कसोटी सामन्यांमधील नकळत रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर झालेला आहे. राहुल द्रविड कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा बोल्ड आउट झालेला आहे. कसोटी मध्ये 13 हजारांपेक्षा अधिक धावांची नोंद केलेल्या राहुल द्रविडने कसोटी मध्येच 54 वेळा बोल्ड आउट होण्याचा रेकॉर्ड नोंदवला आहे. तर यानंतर कसोटी मध्ये ऑस्ट्रेलियाचे एलन बॉर्डर 53 वेळा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 48 वेळा बोल्ड आउट झाले आहेत.

कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड -
क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. तर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड वेस्टइंडीज संघातील कर्टने वॉल्श या खेळाडूच्या नावावर आहे. कसोटीमध्ये 500 पेक्षा अधिक विकेट कर्टने वॉल्श या गोलंदाजाने घेतले आहेत. मात्र सर्वात शेवटी फलंदाजीसाठी येणारा कर्टने वॉल्श 185 कसोटीत 43 वेळा शून्यावर आउट झाला आहे. त्याच्यानंतर न्यूझीलंड संघाचा क्रिस मार्टिन 36 वेळा व ऑस्ट्रेलियाचा ग्लैन मॅकग्रा 35 वेळा शून्य धावांवर बाद झाला आहे.  

मास्टर ब्लास्टरची विकेट घेतल्यामुळे 'या' खेळाडूला मिळाले होते गिफ्ट 

कसोटी सामन्यातील सर्वात महाग षटक - 
एकदिवसीय अथवा टी20 सामन्यांमध्ये खेळाडू एका षटकात सगळ्यात अधिक धावा करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र कसोटीमध्ये एका षटकात सगळ्यात जास्त धावा 28 ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज बेलीने इंग्लंडच्या जिमी एंडरसनच्या गोलंदाजीवर केल्या आहेत. त्यामुळे जिमी एंडरसनचे हे षटक कसोटीतील सर्वात महाग षटक ठरले. जिमी एंडरसननंतर दक्षिण अफ्रीकेचा रॉबिन पीटरसन याने देखील कसोटीत एका षटकात 28 धावा दिल्या आहेत. त्यामुळे या दोन्हीही खेळाडूंनी कसोटी प्रकारात आत्तापर्यंत सगळ्यात महाग षटक टाकले आहे.  

टी20 आणि एकदिवसीय सामन्यातील सर्वात महाग षटक -  
क्रिकेट प्रकारातील कसोटी नंतर टी 20 सामन्यात सर्वात महाग षटक टाकण्याचा विक्रम इंग्लंड संघातील गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर आहे. आणि त्याची धुलाई 2007 मधील टी 20 वर्ल्ड कपच्या दरम्यान भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने केली होती. युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर एकाच षटकात सहा षटकार खेचत 36 धावा केल्या होत्या. तर एकदिवसीय प्रकारात हॉलंड संघातील वॉन बंग्जच्या गोलंदाजीवर  दक्षिण अफ्रीकेच्या हर्शल गिब्सने 2007 मधील वर्ल्ड कप दरम्यान, एका षटकात सहा षटकार लगावत 36 धावा केल्या होत्या. त्यामुळे वॉन बंग्जचे हे षटक चांगलेच महागात पडले होते.   

राहुल द्रविड हा जगातील सगळ्यात जास्त अंडररेटेड खेळाडू - इरफान पठाण 

कसोटी सामन्यात एकाच षटकात सगळ्यात जास्त नो बॉल - 
क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात गोलंदाजाने टाकलेला नो बॉल सगळ्यात जास्त वाईट समजला जातो. असाच काहीसा रेकॉर्ड वेस्टइंडीज संघातील कर्टले एंब्रोसइस या गोलंदाजावर नोंदवला गेला आहे. आपल्या कसोटी करिअर मध्ये 400 हून अधिक विकेट घेणाऱ्या कर्टले एंब्रोसइसने 1993 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या कसोटीत एका षटकात 9 नो बॉल टाकले होते. त्यामुळे हे षटक 15 बॉलचे झाले होते. पण तरीदेखील याच सामन्यात कर्टले एंब्रोसइसने 5 विकेट घेत मॅन ऑफ द मॅच चा खिताब जिंकला होता.  

कसोटी सामन्यात सगळ्यात हळुवार खेळी करत नोंदवलेले शतक - 
क्रिकेटची सुरवात झालेल्या कसोटी प्रकाराला पूर्वीपेक्षा आज उतरती कळा लागल्याचे म्हटले जाते. कारण या प्रकारात फलंदाज विकेट टिकवून ठेवण्यासाठी म्हणून अधिक खेळत असतो. अशाच एका कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या मुदस्सर नजर या खेळाडूने 557 मिनट फलंदाजी करत शतक नोंदवले होते. हे शतक मुदस्सर नजरने 1977-78 मध्ये लाहोर येथे झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात नोंदवले होते.                       
                                                    

 


​ ​

संबंधित बातम्या