गांगुली खूप भारी नाही, दिल्ली कॅपिटल्स सोड नाहीतर सीएसी तरी

वृत्तसंस्था
Saturday, 14 September 2019

भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली आता प्रशासक म्हणून कार्यरत असताना परस्पर हितसंबंधाचा मुद्दा त्याच्या प्रशासक कारकिर्दीत अडचण ठरू पाहात आहे. "बीसीसीआय'चे लोकपाल डी. के. जैन यांनी "बीसीसीआय'ला गांगुली एकाच पदावर राहील याकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे. या मुद्यावर यापूर्वी गांगुलीला संशयाचा फायदा मिळाला असला, तरी त्याने एकापेक्षा अधिक जबाबदाऱ्या स्वीकारू नयेत, असे जैन यांनी "बीसीसीआय'ला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

नवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली आता प्रशासक म्हणून कार्यरत असताना परस्पर हितसंबंधाचा मुद्दा त्याच्या प्रशासक कारकिर्दीत अडचण ठरू पाहात आहे. "बीसीसीआय'चे लोकपाल डी. के. जैन यांनी "बीसीसीआय'ला गांगुली एकाच पदावर राहील याकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे. या मुद्यावर यापूर्वी गांगुलीला संशयाचा फायदा मिळाला असला, तरी त्याने एकापेक्षा अधिक जबाबदाऱ्या स्वीकारू नयेत, असे जैन यांनी "बीसीसीआय'ला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. गांगुली सध्या बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहे. त्याचबरोबर सीएएसीचा सदस्य आणि दिल्ली कॅपटल या आयपीएल फ्रॅंचाईजीचा सल्लागर आहे. यावरून त्याला नोटीस बजावण्यात आली होती. तेव्हा गांगुली क्रिकेट सल्लागार (सीएसी) पदावरून दूर झाला होता. आता जैन यांनी नव्याने हा मुद्दा उपस्थित करून नियम 38(4) नुसार गांगुली याने कुठलेही एकच पद निश्‍चित करावे, असे बीसीसीआयला कळविले आहे.


​ ​

संबंधित बातम्या