जोकोविचची गोल्डन मास्टर्स कामगिरी

वृत्तसंस्था
Tuesday, 21 August 2018

मॅसन (ओहियो) : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अखेर प्रदीर्घ कालावधीनंतर विजेतेपद मिळविले. जोकोविचने सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धा जिंकताना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा 6-4, 6-4 असा सहज पराभव केला. कारकिर्दीत जोकोविचला एटीपी मास्टर्स 1000 या श्रेणीतील याच विजेतपदाने अनेकदा हुलकावणी दिली होती. सहाव्या प्रयत्नांत त्याने येथे विजेतेपद मिळविले.

जोकोविचने कारकिर्दीमधील पहिली गोल्डन मास्टर्स कामगिरी केली. त्याने 1990 मध्ये सुरू झालेल्या स्पर्धा मालिकेतील नऊच्या नऊ स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याची कामगिरी केली. 
 
संबंधित बातम्या