ग्रीसच्या स्टीफानोसकडून जोकोविचचा पराभव

वृत्तसंस्था
Saturday, 11 August 2018

ग्रीसचा नवोदित स्पर्धक स्टीफानोस त्सित्सिपास याने रॉजर्स करंडक टेनिस स्पर्धेत सनसनाटी निकाल नोंदविताना विंबल्डन विजेत्या नोव्हाक जोकोविचला 6-3, 6-7 (5-7), 6-3 असे पराभूत केले.

टोरांटो : ग्रीसचा नवोदित स्पर्धक स्टीफानोस त्सित्सिपास याने रॉजर्स करंडक टेनिस स्पर्धेत सनसनाटी निकाल नोंदविताना विंबल्डन विजेत्या नोव्हाक जोकोविचला 6-3, 6-7 (5-7), 6-3 असे पराभूत केले. तिसऱ्या फेरीतील पराभव जोकोविचसाठी धक्कादायक ठरला. त्याला नववे मानांकन होते. स्टीफानोस येत्या रविवारी 20 वर्षांचा होईल. तो जागतिक क्रमवारीत 27व्या क्रमांकावर आहे. 

तो म्हणाला, ""अशा दिग्गजांना हरविणे कोणत्याही मुलाचे स्वप्न असते. त्यामुळे हा विजय माझ्या आयुष्यातील एक सर्वोत्तम क्षण ठरेल.'' स्टीफानोसची सर्व्हिस आणि फोरहॅंड जोकोविचसाठी डोकेदुखी ठरले. अग्रमानांकित रॅफेल नदालने आगेकूच केली. त्याने स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉव्रींकाला 7-5, 7-6 (7-4) असे पराभूत केले. निर्णायक सेटमध्ये सुरवातीलाच ब्रेक मिळविल्यानंतर त्याने पकड भक्कम केली. 
 

संबंधित बातम्या