'इंग्लंडमध्ये भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक'

वृत्तसंस्था
Monday, 17 September 2018

मी इंग्लंडविरुद्धची मालिका पाहिली. भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक झाली. 2007 मध्ये इंग्लंडमध्ये गेलेल्या भारतीय संघाची गोलंदाजी सर्वोत्तम होती. आम्ही लॉर्डस कसोटी वाचविली होती. ईशांत हा संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज असल्याने त्याने मालिकेत 25 बळी घेणे अपेक्षित होते, 18 नाही. मला एका डावात पाच बळी घेतले पाहिजे होते, असे म्हणायचे नाही तर किमान सामन्यामध्ये तर पाच बळी घ्यायला हवे होते.

नवी दिल्ली : इंग्लंडमधील भारतीय गोलंदाजांची कामगिरीचे कौतुक होत असताना माजी गोलंदाज एस. श्रीशांत याने भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक झाल्याचे म्हटले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी 59 बळी घेण्यात यश मिळविले होते. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याने त्याचे अनेक आजी-माजी खेळाडूंनी कौतुक केले. फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्याचे कर्णधार कोहलीनेही मान्य केले आहे. भारताला या मालिकेत 4-1 असा दारुण पराभव स्वीकारावा लागला. भारत 2007 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला असताना झहीर खान, आरपी सिंह यांच्यासह श्रीशांतही गोलंदाजांच्या फळीमध्ये होता. तेव्हा वेगवान गोलंदाजांची कामगिरी चांगली झाली होती, असे त्याचे म्हणणे आहे. श्रीशांत आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय संघाबाहेर आहे.

श्रीशांत म्हणाला, की मी इंग्लंडविरुद्धची मालिका पाहिली. भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक झाली. 2007 मध्ये इंग्लंडमध्ये गेलेल्या भारतीय संघाची गोलंदाजी सर्वोत्तम होती. आम्ही लॉर्डस कसोटी वाचविली होती. ईशांत हा संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज असल्याने त्याने मालिकेत 25 बळी घेणे अपेक्षित होते, 18 नाही. मला एका डावात पाच बळी घेतले पाहिजे होते, असे म्हणायचे नाही तर किमान सामन्यामध्ये तर पाच बळी घ्यायला हवे होते.

संबंधित बातम्या