कॅरेबियन लीगच्या मागील हंगामातील किंगची फटकेबाजी (व्हिडिओ)

सुशांत जाधव
Monday, 10 August 2020

संपूर्ण मालिकेत ब्रेंडन किंगचा दबदबा पाहायला मिळाला. त्याने या मालिकेत 12 सामन्यातील 12 डावात 55.11 च्या सरासरीने 494 धावा केल्या होत्या.

कॅरेबियन लीगच्या आठव्या हंगामात अनेक स्टार खेळाडूंच्या भात्यातील फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. विंडीजचा स्टार फलंदाज ब्रेंडन किंग हा लक्षवेधी फलंदाजापैकी एक असेल. मागील हंगामात गुयाना अमेझॉन वॉरियर्सच्या ताफ्यातील क्रिकेटच्या मैदानातील या योद्ध्याने तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. पण अंतिम सामन्यात त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. 

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

2019 मध्ये बारबाडोस ट्रिडेंट्सने दुसऱ्यांदा कॅरेबियन लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्या प्रथम फलंदाजी करताना बारबोडोस ट्रिडेंट्स संघाने निर्धारित 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 171 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुयाना अमेझॉन वॉरियर्सने 9 बाद 144 धावांपर्यंत मजल मारली होती. ब्रेंडन किंगने या सामन्यात 33 चेंडूत 43 धावांची फटकेबाजी केली होती. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय निश्चित करण्यात अपयशी ठरली होती. 

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या गड्याचा बोलबाला

संपूर्ण मालिकेत ब्रेंडन किंगचा दबदबा पाहायला मिळाला. त्याने या मालिकेत 12 सामन्यातील 12 डावात 55.11 च्या सरासरीने 494 धावा केल्या होत्या. यात 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश होता. संपूर्ण स्पर्धेत त्याने 44 चौकार आणि 32 षटकार खेचले होते. बारबाडोस ट्रिडेंट्स संघाच्या हेडन वॉल्श ज्यूनियरने 22 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवत सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा पराक्रम करुन दाखवा होता.  
 


​ ​

संबंधित बातम्या