पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी श्रीलंकेला मिळाले करोडो रुपये?

वृत्तसंस्था
Wednesday, 25 September 2019

दहशतवादी हल्ल्याची भीती असतानाही श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर रवाना झाला. सुरक्षिततेबाबत दिलेले शब्द पाकिस्तानकडून पाळला जाईल अशी अपेक्षा श्रीलंका संघ करत आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला करोडो रुपये दिल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, पाकिस्तानक्रिकेट बोर्डाने हा आरोप फेटाळून लावला आहे. 

कराची : दहशतवादी हल्ल्याची भीती असतानाही श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर रवाना झाला. सुरक्षिततेबाबत दिलेले शब्द पाकिस्तानकडून पाळला जाईल अशी अपेक्षा श्रीलंका संघ करत आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला करोडो रुपये दिल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, पाकिस्तानक्रिकेट बोर्डाने हा आरोप फेटाळून लावला आहे. 

पाकिस्तानमधील उर्दू वृत्तपत्र 'जंग'ला दिलेल्या मुलाखतीत पीसीबीचे अध्यक्ष वसीन खान यांनी या साऱ्या अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ''पाकिस्तानने श्रीलंकेला पाकिस्तान खेळण्यासाठी एकही रुपया दिलेला नाही,'' असे त्यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, ''आम्ही पाकिस्तानला एकही रुपया दिलेला नाही. ते कोणत्याही मोबदल्याशिवाय पाकिस्तानात येत आहे. आता पाकिस्तानमधील वातावरणात बदल झाला आहे. देशातील सुरक्षा वाढली आहे. त्यामुळे आता देशांतर्गत क्रिकेटही संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार नाही. पाकिस्तान आता सुरक्षित आहे त्यामुळे कोणत्याही देशान पाकिस्ताना खेळण्यासाठी न येण्याचे कारण नाही. तसेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये सामने खेळवणे खूप महाग प्रकरण आहे.''

2009 मध्ये लाहोर येथे श्रीलंका संघाच्या गाडीवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिलेला आहे. त्यानंतर अमिराती हे पाकिस्तान संघाचे होम ग्राऊंड झालेले आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा पाकिस्तानमध्ये परतावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानने श्रीलंकेचा हा मर्यादित षटकांचा दौरा आयोजित केला. सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली तरी श्रीलंकेच्या 10 प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली. यातील पहिला ट्‌वेन्टी-20 सामना शुक्रवारी होत आहे.


​ ​

संबंधित बातम्या