ऍमिओ करंडक राष्ट्रीय रेसिंग स्पर्धेत कोल्हापूरचा ध्रुव चमकला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 August 2018

कोल्हापूरच्या ध्रुव मोहिते याने ऍमिओ करंडक राष्ट्रीय रेसिंग मालिकेत सफाईदार ड्रायव्हिंगच्या जोरावर चौथा विजय मिळविला. ठाण्याचा सौरव बंदोपाध्याय दुसरा आला, तर पुण्याच्या प्रतीक सोनावणेला मागे टाकत हैदराबादच्या जीत जाबाख याने तिसरा कमरांक मिळविला. 

चेन्नई : कोल्हापूरच्या ध्रुव मोहिते याने ऍमिओ करंडक राष्ट्रीय रेसिंग मालिकेत सफाईदार ड्रायव्हिंगच्या जोरावर चौथा विजय मिळविला. ठाण्याचा सौरव बंदोपाध्याय दुसरा आला, तर पुण्याच्या प्रतीक सोनावणेला मागे टाकत हैदराबादच्या जीत जाबाख याने तिसरा कमरांक मिळविला. 
मद्रास मोटर स्पोर्टस क्‍लबच्या ट्रॅकवरील शर्यत ध्रुवने एकतर्फी ठरविली. त्याने एक मिनीट 54.959 अशी सर्वाधिक वेगवान वेळही नोंदविली. 

त्याने आठ फेऱ्यांची शर्यत 15 मिनिटे 28.719 सेकंद वेळेत पूर्ण केली. सौरवला (1ः43.499) त्याने सुमारे साडेचार सेकंदांनी मागे टाकले. पात्रता फेरीतील सर्वोत्तम वेळेमुळे पोल पोझिशन मिळविलेल्या ध्रुवने वेगवान प्रारंभानंतर आघाडी राखण्यावर आणि पर्यायाने टायरची झीज जास्त होणार नाही यावर लक्ष केंद्रित केले. यात यशस्वी झाल्यामुळे त्याने आनंद व्यक्त केला. फोक्‍सवॅगन इंडिया रेसिंगचे प्रमुख शिरीष विस्सा यांनी सांगितले की, शर्यत एखाद-दोन अपवाद वगळता सुरळीत पार पडली. मालिका चुरशीने होत आहे. आता निम्मा टप्पा झाला असून, आणखी पाच शर्यती असल्यामुळे प्रमुख स्पर्धकांपैकी प्रत्येकाला संधी असेल. 

संबंधित बातम्या