...म्हणूनच धोनी सर्वात्तम कर्णधार ; रिकी पॉन्टिंगकडून धोनीचे कौतुक  

टीम ई-सकाळ
Monday, 24 August 2020

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने देखील एमएस धोनीच्या स्वभावाबद्दल आणि कोणत्याही परिस्थिती मध्ये शांत राहण्याच्या कृतीचे कौतुक केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली. धोनीने आपल्या आवडत्या  गाण्यासोबत सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम वरून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले. धोनीच्या या निर्णयानंतर क्रिकेट जगतासह सर्वांनीच त्याला शुभेच्छा देत, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमधील कामगिरीबद्दल कौतुक केले. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने देखील एमएस धोनीच्या स्वभावाबद्दल आणि कोणत्याही परिस्थिती मध्ये शांत राहण्याच्या कृतीचे कौतुक केले आहे.

धोनीच्या फेअरवेल सामन्यासाठी बीसीसीआय तयार 

महेंद्रसिंग धोनीने आपल्या 16 वर्षाच्या दीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भरीव कामगिरी करत क्रिकेटच्या जगतात आपले नाव शिखरावर नेऊन ठेवले आहे. 2014 मध्ये त्याने कसोटी क्रिकेट मधून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. तर त्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेट मधून देखील धोनी निवृत्त झाला आहे. संपूर्ण क्रिकेट जगतात इतिहास घडवणाऱ्या धोनीच्या निवृत्तीने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. धोनीच्या या निर्णयानंतर डायनॅमिक विकेटकीपर आणि फलंदाजासोबत एकत्र खेळलेल्या काही माजी क्रिकेटपटूंनीही त्याच्या उत्तम कारकीर्दीबद्दल त्याचे कौतुक केले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने देखील एका मुलाखतीदरम्यान, महेंद्रसिंग धोनी आपल्या भावनांना आवर घालतो आणि त्याचा हाच गुण सर्वात्तम असल्याचे म्हटले आहे. 

धोनीच्या निवृत्तीनंतर न्यूज चॅनलने लावला भलत्याच 'युवराज सिंग'ला फोन; VIDEO VIRAL  

महेंद्रसिंग धोनी हा उत्तम नेतृत्व करू शकणारा खेळाडू आहे कारण तो आपल्या भावना नियंत्रणात ठेवतो, असे रिकी पॉन्टिंग यावेळेस म्हणाला. तसेच आपण कर्णधार म्हणून जेंव्हा मैदानावर होतो त्यावेळेस भावनांना नियंत्रणात ठेवण्यास बराच प्रयत्न केला, मात्र ते शक्य झाले नसल्याची कबुली रिकी पॉन्टिंगने दिली. याशिवाय धोनी कर्णधार असताना भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी उंचावत गेल्याचे रिकी पॉन्टिंगने नमूद केले. व इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मध्ये देखील धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार असल्यामुळेच हा संघ चांगली कामगिरी करत असल्याचे मत रिकी पॉन्टिंगने या मुलाखतीत व्यक्त केले. 

शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड 

दरम्यान, धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली असल्याने तो आता भारतीय संघाच्या 'ब्लू जर्सी'त खेळताना दिसणार नाही. मात्र ती आयपीएल मध्ये सीएसके संघाकडून खेळताना दिसेल. तर रिकी पॉन्टिंग यंदा आयपीएल मधील दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळणार आहे. धोनीने 2007 पासून ते 2016 पर्यंत भारतीय संघाच्या नेतृत्व पदाची धुरा सांभाळली होती. या कालावधीत भारताने 2007 मध्ये टी20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये आयसीसी वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

   


​ ​

संबंधित बातम्या