धोनीची मुंबईत फुटबॉल प्रॅक्टीस

वृत्तसंस्था
Wednesday, 9 October 2019

धोनीने स्थापन केलेल्या ऱ्हीती स्पोर्टस्‌ने या गौरव सामन्याचे आयोजन केले आहे. सराव सामन्याच्या जर्सीत धोनी आणि पेस इतर खेळाडूंसह आहेत. याचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करण्यात आले आहे. हा गौरव सामना नेमका कधी होणार याची माहिती उघड करण्यात आलेली नाही.

मुंबई : सध्या क्रिकेटपासून दूर असलेल्या माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने मुंबई आपले फुटबॉल कौशल्य दाखवले. एका गौरव सामन्यात धोनी आणि टेनिसस्टार लिअँडर पेस खेळणार आहेत. स्वतः धोनीने स्थापन केलेल्या ऱ्हीती स्पोर्टस्‌ने या गौरव सामन्याचे आयोजन केले आहे. सराव सामन्याच्या जर्सीत धोनी आणि पेस इतर खेळाडूंसह आहेत. याचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करण्यात आले आहे. हा गौरव सामना नेमका कधी होणार याची माहिती उघड करण्यात आलेली नाही.

क्रिकेटमधून धोनीच्या अनुपलब्धतेबाबत बरीच चर्चा सुरु आहे. सध्या त्याने स्वतःहून ब्रेक घेतलेला आहे, परंतु माजी कर्णधार सुनील गावसकर आणि धोनीचा टीम इंडियातील एकेकाळचा सहकारी गौतम गंभीरने धोनीच्या या ब्रेकबाबत प्रश्‍नचिन्ह उभे केलेले आहे.


​ ​

संबंधित बातम्या