धोनी म्हणतो, हा स्टंट फक्त घरीच करा

वृत्तसंस्था
Wednesday, 1 August 2018

'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनी कर्णधार नसला तरी आजही सतत चर्चेत असतो. त्याने सायकलवर केलेल्या एका स्टंटमुळे तो आता पुन्हा चर्चेत आला आहे. धोनीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या घरात सायकलवर स्टंट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

नवी दिल्ली : 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनी कर्णधार नसला तरी आजही सतत चर्चेत असतो. त्याने सायकलवर केलेल्या एका स्टंटमुळे तो आता पुन्हा चर्चेत आला आहे. धोनीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या घरात सायकलवर स्टंट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

 

Just for fun, plz try it at home.

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

 

धोनी आजही संघातील इतर तरुण मुलांपेक्षा चपळ आहे आणि याचे कारण म्हणजे त्याचा फिटनेस. वयाच्या 37व्या वर्षी सुद्धा तो संघातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू आहे. तो तंदुरुस्त राहण्यासाठी पारंपारिक तंत्रांचा वापर करत नाही. संघातील इतर सहकाऱ्यांसारखा तो कधीच जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत नाही. तो नेहमी वेगवेगळ्या खेळांमधून आणि फिजिकल अॅक्टिव्हिटींमधून तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतो. त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो सायकलवर स्टंट केला आहे आणि त्यावर ''Just for fun, plz try it at home'' असा मेसेजही लिहला आहे. 

धोनीला नुकताच भारतातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याने विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनाही मागे टाकत हा पुरस्कार पटकावला.

संबंधित बातम्या