धोनीने बिझनेस क्लासची सीट दिली फॅनला ; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

टीम ई-सकाळ
Saturday, 22 August 2020

एम एस धोनीने पुन्हा एखदा साध्या राहणीचा दाखला देत नम्रतेचे उदाहरण दिले आहे. 

सध्या खेळ जगतात सर्वात यशस्वी आणि पाय जमिनीवर असलेल्या खेळाडूचा विचार करायचा म्हटल्यास एकच नाव समोर येते. आणि ते म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. नुकतेच 15 ऑगस्ट रोजी धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यानंतर आज तो यंदाच्या संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) स्पर्धेसाठी दुबईला रवाना झाला. मात्र यावेळेस देखील एम एस धोनीने पुन्हा एखदा साध्या राहणीचा दाखला देत नम्रतेचे उदाहरण दिले आहे. 

धोनीच्या फेअरवेल सामन्यासाठी बीसीसीआय तयार 

यंदाच्या बहुप्रतीक्षित आयपीएल स्पर्धेचा तेरावा हंगाम युएईमध्ये पुढील महिन्याच्या 19 सप्टेंबर पासून ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचे खेळाडू, सहकारी आणि कर्मचारी सदस्य आज युएईच्या विमानात सवार झाले. यावेळेस उड्डाणा दरम्यान, धोनीने विमानातील इकॉनॉमी क्लासच्या प्रवाश्यासह आपली बिझिनेस क्लासच्या सीटची अदलाबदल केली आहे. इकॉनॉमी क्लास मधील या व्यक्तीचे पाय दोन सीट मधील असणाऱ्या कमी अंतरामुळे पुरत नसल्यामुळेच धोनीने स्वतःच्या बिझिनेस क्लास मधील सीट त्या प्रवाश्यास दिली.  

...जेंव्हा विराट कोहलीने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले ; वाचा सविस्तर        

सीएसके संघाचा सदस्य असलेल्या जॉर्जने विमानातील या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून, त्याच्या या व्हिडिओला सीएसकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून लाईक देखील करण्यात आले आहे. जॉर्जने ट्विट करताना, '' जेव्हा एखादी व्यक्ती हे सर्व पाहतो, क्रिकेटमध्ये शिखरावर पोहचतो आणि स्वतःहून सांगतो की, आपले पाय खूप लांब आहेत, त्यामुळे तुम्ही माझ्या आसनावर बसा व मी इकॉनॉमी क्लासमध्ये बसतो. अशावेळी कर्णधार मला चकित करण्यासाठी कधीही अपयशी ठरत नाही,'' असे म्हटले आहे.     

धोनीच्या निवृत्तीनंतर न्यूज चॅनलने लावला भलत्याच 'युवराज सिंग'ला फोन; VIDEO VIRAL  

जॉर्जने ट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये,  धोनी विमानाच्या इकॉनॉमी क्लासमध्ये बसला असून, त्याच्यासोबत सुरेश रैना आणि इतर काही सीएसके संघाचे सदस्य गप्पा मारत आहेत. यापूर्वी देखील अनेक क्रिकेटपटूंनी खेळपट्टीवर आणि खेळाच्या बाहेर देखील धोनीच्या नम्रतेच्या कहाण्या सांगितल्या आहेत. तसेच धोनी लॉकडाउनच्या वेळेस शेती करत, ट्रॅक्टर चालवत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर आले होते. तर मैदानावर देखील धोनी चाहत्यांना भेटल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले होते.   

दरम्यान, स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी धोनीने आपल्या आवडत्या गाण्यासोबत सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम वरून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. धोनीच्या या निर्णयाचा क्रिकेट जगतासह सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. धोनीने 2007 पासून ते 2016 पर्यंत भारतीय संघाच्या नेतृत्व पदाची धुरा सांभाळली होती. या कालावधीत भारताने 2007 मध्ये टी20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये आयसीसी वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.       

 

 


​ ​

संबंधित बातम्या