मी विराटसाठी कर्णधारपद सोडले : धोनी

वृत्तसंस्था
Friday, 14 September 2018

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडण्याचे कारण अखेर स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडण्याचे कारण अखेर स्पष्ट केले आहे.

आपण योग्यवेळी कर्णधारपदाची जबाबदारी सोडल्याचे मान्य करत त्याने त्यामागचे कारणही स्पष्ट केले. तो म्हणाला, ''मी योग्यवेळी कर्णधारपद सोडले. नवीन कर्णधाराला 2019मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडकासाठी संघबांधणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा या हेतूने मी कर्णधारपद सोडले.''

"कर्णधाराला पुरेसा वेळ न देता मजबूत संघाची निवड करणे शक्य नाही आणि त्यामुळेच मी वेळेत कर्णधारपद सोडणे गरजेचे होते,'' असेही त्याने स्पष्ट केले. 

इंग्लंड दौऱ्यात झालेल्या भारताच्या पराभवाबद्दल बोलताना तो म्हणाला, ''भारताने इंग्लंडमध्ये कमी सराव सामने खेळले. कसोटी मालिकेपूर्वी सराव सामने खेळण्याच्या संघी असूनही भारताने त्यांचा फायदा घेतला नाही. याच कारणामुळे भारतीय फलंदाजांना इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेण्यात अडचणी आल्या.'' मात्र ''हा सर्व खेळाचा भाग आहे. भारत सध्या कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे हे विसरुन चालणार नाही,'' असेही त्याने स्पष्ट केले. 

धोनीने जानेवारी 2017मध्ये ट्वेंटी20 आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सो़डले. त्याने 2014मध्ये कसोटी क्रिकेटमधूनही तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती.    

संबंधित बातम्या