पुण्याच्या देविका घोरपडेचा 'गोल्डन पंच' 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 September 2018

मधुरा, सनाला रौप्यपदक 
सुवर्णपदकांच्या लढतीत महाराष्ट्राच्या मधुरा पाटील व सना गोन्साल्विसला मात्र पराभव पत्करावा लागला. रायगडच्या मधुराला (52 किलो) मणिपूरच्या कुंजराणी देवीने, तर पालघरच्या सनाला (60 किलो) आंध्र प्रदेशच्या मोनालिसा दासने पराभूत केले. या पराभवामुळे दोघींनाही रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले. 
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. मुख्यमंत्र्यांनी या वेळी बोलताना खेळाडूंचे अभिनंदन करताना अशा स्पर्धेतून भविष्यात अनेक मेरी कोम घडतील अशी आशा व्यक्त केली. त्याच वेळी शासनाने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकणाऱ्या 24 खेळाडूंना एकाचवेळी "अ' आणि "ब' श्रेणीत थेट नोकऱ्या दिल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. 

नागपूर : पुण्याच्या देविका घोरपडेने नागपूर महानगर मुष्टियुद्ध संघटना आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित 14 वर्षांखालील मुलींच्या महापौर चषक राष्ट्रीय सबज्युनियर मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राची शान राखली. मधुरा आणि सना या अंतिम फेरी गाठणाऱ्या अन्य दोघींना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. देविका आपल्या कामगिरीने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. 

सिव्हिल लाइन्स येथील राणी कोठी येथे शुक्रवारी संपलेल्या स्पर्धेत 46 किलो वजनी गटात सहभागी देविकाने तापाची पर्वा न करता अंतिम सामन्यात दिल्लीच्या संजनाचा 5-0 गुणांनी धुव्वा उडवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. माजी ऑलिंपियन मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या 13 वर्षीय देविकाला बुधवारी रात्री 102 डिग्री ताप होता. त्याही परिस्थितीत तिने जिद्‌दीने उपांत्य व अंतिम लढती जिंकल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर झालेल्या या लढतीत देविकाने संजनाला तिन्ही फेऱ्यांमध्ये जोरदार ठोसे लगावत महाराष्ट्राला स्पर्धेतील एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले. 

मधुरा, सनाला रौप्यपदक 
सुवर्णपदकांच्या लढतीत महाराष्ट्राच्या मधुरा पाटील व सना गोन्साल्विसला मात्र पराभव पत्करावा लागला. रायगडच्या मधुराला (52 किलो) मणिपूरच्या कुंजराणी देवीने, तर पालघरच्या सनाला (60 किलो) आंध्र प्रदेशच्या मोनालिसा दासने पराभूत केले. या पराभवामुळे दोघींनाही रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले. 
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. मुख्यमंत्र्यांनी या वेळी बोलताना खेळाडूंचे अभिनंदन करताना अशा स्पर्धेतून भविष्यात अनेक मेरी कोम घडतील अशी आशा व्यक्त केली. त्याच वेळी शासनाने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकणाऱ्या 24 खेळाडूंना एकाचवेळी "अ' आणि "ब' श्रेणीत थेट नोकऱ्या दिल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. 

अन्य निकाल (अंतिमफेरी) : 34 किलो : मुस्कान (हरियाना) वि. वि. भावना (पंजाब) 5-0, 36 किलो : निशा (हरियाना) वि. वि. एम. लोशिनी (तमिळनाडू) 5-0. 38 किलो : वेनिका चानू (मणिपूर) वि. वि. परिणिता (हरियाना) 4-1, 40 किलो : प्राची किन्हा(हरियाना) वि. वि. सिया (दिल्ली) 5-0. 42 किलो : प्राची (हरियाना) वि. वि. कशिश (हिमाचल प्रदेश) 5-0, 44 किलो : तमन्ना (हरियाना) वि. वि. मोनिका (उत्तराखंड) 5-0. 48 किलो : निवेदिता कार्की (उत्तराखंड) वि. वि. गायत्री देवी (मणिपूर) 3-2. 50 किलो : खुशी (हरियाना) वि. वि. इथोईबी चानू (मणिपूर) 3-2. 52 किलो : आंचल सैनी (हरियाना) वि. वि. यामिनी तन्वर (दिल्ली) 5-0. 57 किलो : प्रीती दहिया (हरियाना) वि. वि. स्वप्ना (आंध्र प्रदेश) 5-0. 63 किलो : प्रांजल यादव (हरियाना) वि. वि. विशाखा वर्तिया (पंजाब) 5-0.

​ ​

संबंधित बातम्या