सिंधू, वर्मा, साईप्रणितचा दुसऱ्या फेरीत पराभव

वृत्तसंस्था
Thursday, 17 October 2019

- भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणित, समीर वर्मा यांना डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

- या तिघांच्या पराभवामुळे या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले

-  दुहेरीत सत्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.  

ओडेन्स (डेन्मार्क) - भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणित, समीर वर्मा यांना डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या तिघांच्या पराभवामुळे या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. 
महिला एकेरीस भारताच्या पी. व्ही. सिंधूला दक्षिण कोरियाच्या से यंग अन हिच्याकडून 14-21, 17-21 असा पराभव पत्करावा लागला. समीर वर्माला चीनच्या चेन लॉंग याने 12-21, 10-21 असे पराभूत केले. बी. साईप्रणितला अव्वल मानांकित केंटो मोमोटा याने 6-21, 14-21 असे हरविले. दुहेरीत सत्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. चीनच्या हॅन चेंग कई-झोऊ हाओ डॉंग जोडीने भारतीय जोडीचा 21ृ16, 21-15 असा पराभव केला. 
कोरियाच्या से यंगने सिंधूविरुद्धच्या पहिल्या गेमला 6-1 अशी झकास सुरवात केली. त्या वेळी सिंधूने जोरदार प्रतिकार करत 7-8 अशी पिछाडी कमी केली. पण त्यानंतर सलग सहा गुण गमाविल्यामुळे तिची पिछाडी 7-14 अशी मोठी झाली. ही आघाडी से यंग हिने अखेरपर्यंत कायम राखली. सिंधूला 7-14 अशा पिछाडीनंतर केवळ सात गुण मिळविता आले. 
दुसऱ्या गेमला सिंधूने सलग चार गुण जिंकताना 8-4 अशी आघाडी घेतली. पण से यंग हिने सलग चार गुण घेत 8-8 अशी बरोबरी साधली. त्यानंतर तिने सिंधूला 16-15, 20-16 असे कायम मागे ठेवत दुसऱ्या गेमसह विजयावर शिक्कामोर्तब केले. 
 


​ ​

संबंधित बातम्या