अर्धमॅरेथॉनमध्ये इथिओपियाचे गेमेचू, एडामलाक विजेते

वृत्तसंस्था
Monday, 21 October 2019

- इथिओपियाच्या तेहाय गेमेचू हिने दिल्ली अर्धमॅरेथॉन स्पर्धा विक्रमासह जिंकली. जागतिक स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत चौथी आली होती.

- गेमेचूने एका वर्षापूर्वीची आपली वेळ 50 सेकंदांनी कमी करताना 1 तास 6 मिनिटे वेळ दिली

- एडामलांकने महिलांची विजेती येण्यापूर्वी सात मिनिटे म्हणजेच 59.10 मिनिटांत 21 किलोमीटर पार केले होते

नवी दिल्ली - इथिओपियाच्या तेहाय गेमेचू हिने दिल्ली अर्धमॅरेथॉन स्पर्धा विक्रमासह जिंकली. जागतिक स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत चौथी आलेली गेमेचू विक्रम करीत असताना तिच्या देशाचाच तसेच पुरुषांची स्पर्धा जिंकलेला एडामलाक अंतिम रेषेजवळ होता. 
गेमेचूने एका वर्षापूर्वीची आपली वेळ 50 सेकंदांनी कमी करताना 1 तास 6 मिनिटे वेळ दिली. तिने अखेरच्या पाच किलोमीटरमध्ये इथिओपियाच्याच येलामजेर्फ येहुआलाव हिला पराजित केले. या अखेरच्या टप्प्यात येहूआलाव आघाडीवर होती, पण गेमेचूने अखेरचे काही मीटर असताना वेग वाढत विजेतेपद राखले. दोहातील अपयश दिल्लीत स्पर्धा विक्रम करून काही प्रमाणात भरून काढले, असे गेमेचूने सांगितले. 
एडामलांकने महिलांची विजेती येण्यापूर्वी सात मिनिटे म्हणजेच 59.10 मिनिटांत 21 किलोमीटर पार केले होते. तोही गतविजेता होता. त्याने आपल्या कामगिरीत आठ सेकंदांनी सुधारणा केली. त्याचा स्पर्धा विक्रम पाच सेकंदांनी हुकला. तीन किलोमीटर असताना अचानक पाठीत दुखायला लागले. त्यामुळे स्पर्धा विक्रमापासून दूर राहावे लागले. 
भारतीय गटात स्रीनू बुगाथा अव्वल आला. त्याने 1 तास 4.33 मिनिटे वेळ दिली. त्याने चुरशीच्या शर्यतीत सुरेश पटेल आणि हर्षद म्हात्रेला मागे टाकले. पुरेसे आव्हान नसल्याने आपला स्पर्धा विक्रम हुकला असे स्रीनूने सांगितले. भारतीय महिलांमध्ये एल सुरिया अव्वल आली. तिची वेळ 1 तास 12.49 मिनिटे अशी होती. या स्पर्धेत एकंदर 40 हजार धावपटू सहभागी झाले होते. 
 


​ ​

संबंधित बातम्या