IPL2019 : दिल्ली कॅपिटल्सला मिळणार 'दादा'चे सल्ले

वृत्तसंस्था
Thursday, 14 March 2019

संपूर्ण भारतात आता आयपीएलचा उत्सवाची तयारी सुरु झाली आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स हे नाव बदलून दिल्ली कॅपिटल्स या नव्या नावाने मैदानात उतरणाऱ्या या संघाला भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचे मोलाचे सल्ले लाभणार आहेत.  

आयपीएल 2019 : नवी दिल्ली : संपूर्ण भारतात आता आयपीएलचा उत्सवाची तयारी सुरु झाली आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स हे नाव बदलून दिल्ली कॅपिटल्स या नव्या नावाने मैदानात उतरणाऱ्या या संघाला भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचे मोलाचे सल्ले लाभणार आहेत.    

दिल्ली कॅपिटल्स संघाने गांगुलीची मार्गदर्शक पदासाठी नेमणूक केली आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉंटींगसोबत काम करणार आहे. 

''दिल्ली कॅपिटल्स संघासह काम करण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. या सर्व सहकाऱ्यासोबत काम करण्यास मला जरुर आवडेल,'' असे मत गांगुलीने व्यक्त केले आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली संघाला 26 मार्चला गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा सामना करावा लागणार आहे. 

संबंधित बातम्या