डेंगीवर मात करीत दीपिका एशियाडला

वृत्तसंस्था
Saturday, 18 August 2018

आशियाई क्रीडा तिरंदाजी स्पर्धेत भारताचे आशास्थान असलेली दीपिका कुमारी डेंगीचे आव्हान परतवत रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई : आशियाई क्रीडा तिरंदाजी स्पर्धेत भारताचे आशास्थान असलेली दीपिका कुमारी डेंगीचे आव्हान परतवत रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या आठवड्यात डेंगी झाल्यामुळे ती बुधवारी संघासोबत गेली नव्हती, पुरेशी विश्रांती घेतल्यानंतर ती आता आज रवाना झाली असल्याचे तिरंदाजी संघटनेतील सूत्रांनी सांगितले. त्यास जाकार्ताहून दुजोरा मिळाला आहे. 

तिरंदाजीस मंगळवारपासून सुरवात होणार आहे. त्यादिवशी क्रमांक निश्‍चित करणारी फेरी आहे. त्यापूर्वी तिरंदाजी रेंजशी जुळवून घेण्याची थोडी संधी दीपिकाला मिळणार आहे. अर्थात आजारी असतानाही दीपिकाने यापूर्वी कस लावला आहे. 2012 च्या लंडन ऑलिंपिकच्या वेळी ताप असतानाही ती खेळली होती, पण क्रमवारी निश्‍चित करणाऱ्या फेरीतील चांगल्या कामगिरीनंतर पहिल्याच फेरीत हरली होती. जागतिक क्रमवारीत सातवी असलेल्या दीपिकाने यंदा विश्‍वकरंडक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. 
 

संबंधित बातम्या