Asian Games 2018 : एअर रायफल प्रकारात दीपककुमारचे रौप्य पदक

वृत्तसंस्था
Monday, 20 August 2018

दीपक कुमारने इंडोनेशियात सुरु असलेल्या 18व्या आशियाई स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. अपूर्वी आणि रवी कुमारने पहिल्या दिवशी 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात ब्रॉंझ पदक पटाकवले होते. दीपककुमारने त्याहून उत्तम कामगिरी करत 247.7 गुण कमावले आणि रौप्य पदकावर आपले नाव कोरले.

जकार्ता : दीपक कुमारने इंडोनेशियात सुरु असलेल्या 18व्या आशियाई स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. अपूर्वी आणि रवी कुमारने पहिल्या दिवशी 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात ब्रॉंझ पदक पटाकवले होते. दीपककुमारने त्याहून उत्तम कामगिरी करत 247.7 गुण कमावले आणि रौप्य पदकावर आपले नाव कोरले. दीपककमुारचे सुवर्ण फक्त दोन गुणांनी हुकले. चीनच्या हाओरान यांग याने 249.1 गुण कमावत सुवर्ण पदक पटकावले. 

 

पात्रता फेरीत सुमार कामगिरी करणाऱ्या दीपक कुमारने आज अंतिम फेरीत जबरदस्त पुनरागमन केले. भारताचा रवी कुमार बराच काळ तिसऱ्या स्थानावर होता मात्र शेवटी त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.  

मिश्र गटात जिंकलेल्या ब्रॉंझ पदकामुळे पुरुष एकेरी गटात पदकाच्या अपेक्षा होत्या. पात्रता फेरीत रवीकुमारने 626.7 गुणांसह चौथे, तर दीपकने 626.3 गुणांसह पाचवे स्थान मिळावले. मात्र पात्रता फेरीतील अपयश मागे टाकून दीपकने चीन व तैपेईच्या खेळाडूंसमोर कडवे आव्हान उभे केले. 

वेगवान सुरवात करुनही दीपक पाचव्या क्रमांकावर झुंजत होता मात्र नंतर त्याने जोरदार पुनरागमन करत सर्वांना मागे टाकले आणि रौप्य पदक पटकावले. शेवटच्या काही शॉट्समध्ये तो चुकल्याने त्याचे सुवर्ण पदक हुकले.  त्याच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

 

संबंधित बातम्या