13 चेंडूंत 10 विकेट; नव्या चेंडूचा नवा 'दादा'

ज्ञानेश भुरे
Friday, 15 November 2019

भारतीय संघाच्या या उदयोन्मुख गोलंदाजीने तीन वेगवेगळ्या सामन्यात खेळताना 13 चेंडूंत दहा गडी बाद केले आहेत. विविध तेरा सामन्यात 10 गडी बाद करण्याच्या त्याच्या कामगिरीला बांगलादेशविरुद्धच्या टी 20 सामन्याने होते. त्याने या सामन्यात अखेरच्या तीन चेंडूंवर तीन गडी बाद केले.

नवी दिल्ली : सध्या क्रिकेट विश्‍वात खास करून टी 20 क्रिकेट विश्‍वात दीपक चहरचाच बोलबाला दिसून येत आहे. नव्या चेंडूंचा तो "दादा' ठरत आहे. अखेरच्या निर्णायक षटकांत तो इतरांपेक्षा अधिक धोकादायक ठरत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या पाच दिवसांत त्याने अशी काही कामगिरी केली आहे की अन्य कुठल्या गोलंदाजाने केलेली नाही.

थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय, धोनीची नेटप्रॅक्टीस सुरु 

भारतीय संघाच्या या उदयोन्मुख गोलंदाजीने तीन वेगवेगळ्या सामन्यात खेळताना 13 चेंडूंत दहा गडी बाद केले आहेत. विविध तेरा सामन्यात 10 गडी बाद करण्याच्या त्याच्या कामगिरीला बांगलादेशविरुद्धच्या टी 20 सामन्याने होते. त्याने या सामन्यात अखेरच्या तीन चेंडूंवर तीन गडी बाद केले.

त्यानंतर दोनच दिवसांनी त्याने मुश्‍ताक अली टी 20 सामन्यात विदर्भाविरुद्ध सहा चेंडूंत चार गडी बाद केले. पण, चहर इतक्‍यावरच समाधानी नाही राहिला, तर त्याने त्यानंतर दोन दिवसांनी त्याच स्पर्धेत उत्तर प्रदेशाविरुद्ध चार चेंडूंत तीन गडी बाद केले. 

बांगलादेशविरुद्धच्या टी 20 सामन्यात त्याने वीसावे षटक टाकले. त्यात त्याने दोन आणि त्यापूर्वी 18व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर एक गडी बाद केला होत. या हॅटट्रिकनंतर मुश्‍ताक अली टी 20 सामन्यात विदर्भाविरुद्ध त्याला थेट 13व्या षटकांत गोलंदाजी मिळाली. त्या पहिल्याच षटकांत त्याने सहा चेंडूंत 4 गडी बाद केले. त्यानंतर उत्तरप्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने अखेरचे षटक टाकताना तीन गडी बाद केले. 

INDvsBAN : किती ते सातत्य! मयांकचे तिसरे शतक 

दीपकने आतापर्यंत भारताकडून एका एकदिवसीय सामन्यात एकच गडी बाद केला आहे. पण, सात टी 20 सामने खेळताना त्याने 14 गडी बाद केले आहेत. प्रथम श्रेणीचे 45 सामने खेळताना 126, तर अ श्रेणीचे 44 सामने खेळताना त्याने 57 गडी बाद केले आहेत. देशांतर्गत टी 20 क्रिकेटमध्ये 67 सामने खेळताना 87 गडी बाद केले आहेत. त्याच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने 18व्या वर्षी रणजी पदार्पण केले तेव्हा पहिल्याच सामन्यात 10 धावांत 8 गडी बाद केले. त्याच्या भेदक गोलंदाजीसमोर त्या वेळी हैदराबादचा डाव 21 धावांतच आटोपला होता.


​ ​

संबंधित बातम्या