भारताला मोठा धक्का! आता 'हा' खेळाडू एप्रिलपर्यंत संघाबाहेर

वृत्तसंस्था
Tuesday, 24 December 2019

''मला स्वत:ला चहर मार्च-एप्रिलपर्यंत खेळेल की नाही याची शंका आहे. असे असले तरी भारतीय संघाकडे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पुढील सात वर्षतरी बरेच बॅकअप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ''आपल्याकडे पुढील सहा-सात वर्षे बरेच पर्याय तयार असल्याने काहीही काळजी करण्याची गरज नाही.''

नवी दिल्ली : भारताला दुखापतींनी आता चांगलेच ग्रासले आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त होत असतानाच भारतासाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज दिपक चहरला दुखापतीमुळे एप्रिलपर्यंत संघाबाहेर राहावे लागणार असल्याचे भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for deepak chahar

ते म्हणाले, ''मला स्वत:ला चहर मार्च-एप्रिलपर्यंत खेळेल की नाही याची शंका आहे. असे असले तरी भारतीय संघाकडे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पुढील सात वर्षतरी बरेच बॅकअप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ''आपल्याकडे पुढील सहा-सात वर्षे बरेच पर्याय तयार असल्याने काहीही काळजी करण्याची गरज नाही.''

ऑस्ट्रेलियाने निवडले संघ अन् कर्णधार चक्क भारतीय, पाहा कोण?

चहरला भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दुसऱया एकदिवसीय सामन्यात पाठीची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यालाही मुकावे लागले होते. त्याच्याऐवजी नवदीप सैनीला संघात स्थान देण्यात आले होते. 


​ ​

संबंधित बातम्या