INDvsBAN : सहा गडी बाद करण्यापूर्वी चहरने नेट्समध्ये टाकलेले तब्बल एक लाख चेंडू

वृत्तसंस्था
Wednesday, 13 November 2019

ट्वेंटी20 क्रिकेट मध्ये हॅट्रीक मिळवणारा पहिला भारतीय पुरुषही ठरला. याच अविश्वसनीय विक्रमामुळे गेल्या काही दिवसात दीपक सध्या चर्चेत आहे. हा विक्रम असाच सहजासहजी मिळाला नाही. खेळाच्या आधी त्याने नेट्समध्ये तब्बल एक लाख वेळा चेंडू फेकण्याचा सराव केला होता.

नागपूर : बांगलादेशाविरुद्ध दीपक चहरने सात धावा देऊन हॅटट्रिकसह एकूण सहा बळी मिळवले होते. याची नोंद जागतिक विक्रम म्हणून झाली आहे. 3.2 षटकं, सात धावा आणि सहा बळी.. हा एक असा आकडा आहे ज्यावर सहजरित्या विश्वास बसणे अवघड आहे. पण भारताचा गोलंदाज दीपक चहरने बांगलादेशाविरुद्ध अशा प्रकारचे प्रदर्शन करून फक्त भारतीय क्रिकेट टीमचेच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

सगळं संपलं नाहीये, एकदिवसीय संघातही परतेन : रहाणे 

ट्वेंटी20 क्रिकेट मध्ये हॅट्रीक मिळवणारा पहिला भारतीय पुरुषही ठरला. याच अविश्वसनीय विक्रमामुळे गेल्या काही दिवसात दीपक सध्या चर्चेत आहे. हा विक्रम असाच सहजासहजी मिळाला नाही. खेळाच्या आधी त्याने नेट्समध्ये तब्बल एक लाख वेळा चेंडू फेकण्याचा सराव केला होता. तेव्हा कुठे त्याला हे यश मिळाले आहे.

हळूहळू साकार होणार स्वप्न
मागच्याच  वर्षी जुलै मध्ये इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी20 क्रिकेट ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट असा प्रवास करणारा चहर आत्तापर्यंत सात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 वन डे मॅच मध्ये मैदानावर उतरला आहे.

INDvsBAN : बिच्चारा शाहबाज नदीम!; संघातील स्थान गमाविणार?

सेव्हिंगच्या पैशातून बनवला टर्फ
दीपकच्या वडिलांनी आपल्या बचत केलेल्या पैशातून आग्रा येथे एक टर्फ आणि एक कॉंक्रिट पिच बनवला. जेणेकरून आपला मुलगा त्या ठिकाणी सराव करू शकेल. दिपकच्या वडिलांनी सांगितले की, ट्रेनिंगमुळे त्यांचा मुलगा आठवीत असताना नियमित शाळेत जाऊ शकला नाही. तेव्हा दिवसाचे 24 तासही कमी पडत होते. ट्रेनिंग, जिम, आराम यातच व्यस्त असायचा.

दीपक चहरची कमाल, तीन दिवसांत घेतली दुसरी हॅटट्रीक!

रोहित शर्मा आता कसोटी नीट खेळ, 'तो' परत येतोय

T20 World Cup 2020 : चौथ्या क्रमांकासाठी आता हाच; 22 चेंडूंत चोपल्या 108 धावा   


​ ​

संबंधित बातम्या