आशिया मॅरेथॉनमध्ये दीपक बंडबेला कास्य 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

आशिया आणि ओसिनिया चॅम्पियनशील 2019 ही मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच जॉर्डनमधील अकाबा शहरामध्ये झाली. या स्पर्धेमध्ये भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, जार्डन, लेबॉनॉन या देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

राजापूर ( रत्नागिरी ) - तालुक्‍यातील शेंबवणे येथील युवक दीपक बंडबे यांने मॅरेथॉनमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करताना आशिया आणि ओसिनिया चॅम्पियनशील 2019 मध्ये कास्यपदक मिळविले आहे. टिम इंडियाने येथे मिळविलेल्या सुवर्णपदकामध्ये दीपक सहभागी होता. दुसरीकडे त्याने या स्पर्धेत नवीन वेळ देत रेकॉर्ड केला आहे. यापूर्वीही दीपकने दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये कास्यपदक मिळवून विक्रम केला होता. 

हेही वाचा - विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल शिवसेनेच्या या आमदारास डाॅक्टरेट 

आशिया आणि ओसिनिया चॅम्पियनशील 2019 ही मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच जॉर्डनमधील अकाबा शहरामध्ये झाली. या स्पर्धेमध्ये भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, जार्डन, लेबॉनॉन या देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भारतामधून पुरुष 6 व महिला 3 स्पर्धकांनी सहभाग घेतला. एकूण पुरुषांमध्ये 17 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये ग्रुप मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुष संघाने सुवर्ण, तर महिला संघाने कास्यपदक पटकावित भारताचा तिरंगा डौलाने फडकाविला. यामध्ये राजापूर तालुक्‍यातील शेंबवणे-गांगोचीवाडी येथील दीपक बंडबेचाही समावेश होता. ही स्पर्धा 100 किमीची होती. वैयक्तिक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दीपक बंडबे याने 100 किमीमध्ये भारतीय नवी वेळ देताना 8 तास 4 मिनिट घेतले. यापूर्वी 2012 साली विनोदकुमार श्रीनिवासन याने 8 तास 9 मिनिट अशी रेकॉर्ड असलेली वेळ दिली होती. सहा वर्षाने दीपकने हे रेकॉर्ड 5 मिनिटे आधी वेळ देत मोडीत काढले आहे. मुंबई बोरीवली येथील बोरीवली नॅशनल पार्क रनिंग ग्रुपने सहकार्य केले. 

हेही वाचा - सह्याद्रीत सापडले दुर्मिळ प्रजातीचे फुलपाखरू 

काही रक्कम अनाथांना 

दीपक बंडबेने यापूर्वी मॅरेथॉनमध्ये अनेक पदके पटकाविताना यातून मिळालेली काही रक्कम अनाथांना देण्याचा एक चांगला आदर्श तरुणांसमोर त्याने ठेवला होता. 


​ ​

संबंधित बातम्या