साजरा करूया रोहितचा `तो` वाढदिवस

शैलेश नागवेकर
Wednesday, 13 November 2019

बरोबर आजच्या दिवशी कोलकाताच्या इडन गार्डनवर सर्वाधिक 264 धावांचा इतिहास रचला होता. धावा किती 264 त्यासाठी घेतले 173 चेंडू सीमापार धाडले 33 चौकार आणि प्रेक्षकांमध्ये भिरकावले नऊ षटकार...अबब !! काय ती अविस्मरणीय खेळी होती.

अनेक विक्रमी खेळी...कर्णधार म्हणून आयपीएलचे विजेतेपद आणि टीम इंडियाचा कधी हंगामी तर कधी बदली कर्णधार म्हणून मिळवलेली मालिका विजेतेपद... 30 एप्रिल हा जन्मदिवस असलेल्या रोहितसाठी ते प्रत्येक दिवस वाढदिवसासारखे अनोखे दिवस. या  प्रत्येक यशाची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही किंवा उजवे डावे करता येणार नाही. तरिही 13 नोव्हेंबर 2014 हा दिवस रोहित सेलिब्रेट नक्कीच करत असणार. त्याचे कारणही तसेच आहे..

INDvsBAN : सहा गडी बाद करण्यापूर्वी चहरने नेट्समध्ये टाकलेले तब्बल एक लाख चेंडू

किती आणि कोणाची नावे घ्यावी अगदी आक्रमक फलंदाजीचे बादशहा व्हिवियन रिचर्डस् यांचा तो जमाना त्यानंतर आधुनिक क्रिकेटचा सम्राट सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पाँटिंग, ख्रिस गेल आत्ताच्या पिढीतील विराट कोहली, डेव्हिड वॉर्नरसारखे शक्तिशाली आणि टायमिंगचे बादशहा असलेले फलंदाज या कोणालाही जमलेले नाही ते नजाकतदार आणि बघायला आरमदायी असावी अशी शैली असणाऱ्या रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये केलेले आहे आणि त्या विक्रमाला आज पाच वर्षे होत आहेत...

Image

एव्हाना लक्षात आले असेल...बरोबर आजच्या दिवशी कोलकाताच्या इडन गार्डनवर सर्वाधिक 264 धावांचा इतिहास रचला होता. धावा किती 264 त्यासाठी घेतले 173 चेंडू सीमापार धाडले 33 चौकार आणि प्रेक्षकांमध्ये भिरकावले नऊ षटकार...अबब !! काय ती अविस्मरणीय खेळी होती. ससेहोलपट झाली होती श्रीलंका संघाची. चेंडू टाकू कोठे आणि त्याच्या मागे धावू कोठे अशी गत श्रीलंका गोलंदाज आणि श्रेत्ररक्षकांची झाली होती.  

सगळं संपलं नाहीये, एकदिवसीय संघातही परतेन : रहाणे 

सुसाट फेरारी...
रोहित अगदी निष्णांत ड्रायव्हरने गाडी चालवावी अशी तो फलंजाजी करतो. सर्व अंदाज येईपर्यंत तो पहिल्या, दुसऱ्या गिअरमध्ये गाडी चालवतो पण एकदा का वेग घेतला की फेरारीच जणू काही मग त्या गाडीला गियर लागत नाही....म्हणूनच असे फलंदाज मोठी इनिंग खेळू शकतात आत्तापर्यंत एवढे रतिमहारथी झाले पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन अर्धशतकांचा विक्रम केवळ रोहितच्या नावावर आहे.

पुनरागमनातली खेळी
13 नोव्हेंबर 2014 हा दिवस रोहितसाठी सुवर्णाक्षरांनी लिहावा असा आहे. केवळ विक्रमी खेळी केली म्हणून नव्हे तर त्याचे ते पुनकागमन होते. मांडीच्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर होतो. तंदुरुस्तीची चाचणी दिल्यानंतर संघात स्थान मिळवले. रोहित संयमाने फलंदाजी करेल असा अंदाज होता. पण रोहितसारखे फलंदाज कसलीही चिंता करत नाही हेच खरे.  

विराट धावचीत आणि रोहितचे विक्रम
याला योगायोग म्हणाव की अन्य काही, पण रोहित आणि विराट जोडी जमत असताना जर विराट धावचीत झाला तर रोहितने मोठी खेळी केली असेच समजावे कारण रोहितच्या त्या 264 धावांच्या खेळी दरम्यान विराट कोहली धावचीत झाला होता. एवढेच नव्हे तर रोहितने त्याचे पहिले वहिले द्विशतक केले (योगायोग म्हणजे तेही नोव्हेंबरमध्ये) त्यावेळीही त्याच्याकडून चूक झाली आणि विराट धावचीत झाला होता. विराट तर वैतागून ड्रेसिंगरुमध्ये परतला होता. पण जेव्हा 264 धावांच्या वेळी विराट असाच धावचीत झाला तेव्हा अनेकांना आता काही तरी मोठा विक्रम होणार याची चाहूल लागली होती, आणि घडलेही तसेच.

 

कशी झाली होती रोहितची ती विक्रमी खेळी
- 50 धावा (72 चेंडू, 5 चौकार)
- 100 धावा (100 चेंडू, 13 चौकार, 1 षटकार)
- 150 धावा (125 चेंडू, 19 चौकार, 3 षटकार)
- 200 धावा (151 चेंडू, 25 चौकार, 3 षटकार)
- 250 धावा (166 चेंडू, 32 चौकार, 8 षटकार)
- 264 धावा (173 चेंडू, 33 चौकार, 9 षटकार)

दीपक चहरची कमाल, तीन दिवसांत घेतली दुसरी हॅटट्रीक!

रोहित शर्मा आता कसोटी नीट खेळ, 'तो' परत येतोय


​ ​

संबंधित बातम्या