#क्रिकेट_डायरी : सातवर्षांपूर्वी सात नंबरी जर्सीनं नोंदवला होता अशक्यप्राय विक्रम

टीम ई-सकाळ
Tuesday, 23 June 2020

धोनीशिवाय कोणत्याही कर्णधाराला असा पराक्रम आतापर्यंत जमलेला नाही. भविष्यातही एखाद्या कर्णधाराला  धोनीचा हा अशक्यप्राय विक्रम मोडणे सोपे नाही.   

सध्याच्या घडीला खेळाची मैदाने ओस पडली आहेत. कोरोनामुळे क्रिकेट जगतावरही मोठे संकट कोसळले आहे. कोरोनाची दहशत संपून क्रिडा जगतात पुन्हा रोमहर्षक क्षणी कधी अनुभवायला मिळणार याकडे तमाम क्रिडा रसिकांचे लक्ष लागून आहे. लॉकडाउनच्या काळात घरात बसून असलेल्या आपल्या चाहत्यांचे खेळाडू घरात बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन करत असल्याचा अनुभव आपल्याला मिळत आहे. खेळाडूंच्या सोशल सक्रियेतेच्या बातम्यासोबतच #क्रिकेट_डायरीच्या माध्यमातून आपण क्रिकेट जगतातील जून्या आठवणींना उजाळा देत आहोत. क्रिकेटच्या इतिहासात आजच्या दिवसाला खास महत्त्व आहे. भारतीय संघाने 23 जून 2013 मध्ये इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करत ICC चॅम्पियनशीप चषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले होते. ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ हा दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकणारा संघ ठरला होता. या स्पर्धेमध्ये धोनीच्या नावावर अनोख्या आणि अशक्यप्राय अशा विक्रमाचीही नोंद झाली होती. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप, मर्यादित षटकांचा वर्ल्डकपनंतर मिनी वर्ल्ड कप असलेल्या चॅम्पियनशीप स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विजेतपद पटकावले होते. धोनीशिवाय कोणत्याही कर्णधाराला असा पराक्रम आतापर्यंत जमलेला नाही. भविष्यातही एखाद्या कर्णधाराला  धोनीचा हा अशक्यप्राय विक्रम मोडणे सोपे नाही.   

जर पुरुषांची स्पर्धा स्थगित झाली तर आमचीही स्पर्धा संकटात येईल : पेरी

सात वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बर्मिंघमच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात चॅम्पियनशीप स्पर्धेच्या जेतेपदासाठी अंतिम सामना रंगला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 129 धावा करत इंग्लंडसमोर 130 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करणाऱ्या यजमान इंग्लंडच्या संघाला धोनीच्या शिलेदारांनी 124 धावांत रोखत भारताला दुसऱ्यांदा चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकून दिली. विशेष म्हणजे या टी-20 सामन्यात दोन्ही संघातील एकाही खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नव्हते. भारताकडून विराट कोहलीने 47 धावांची खेळी केली होती. ही या सामन्यातील सर्वोच्च खेळी ठरली. जडेजाने 33 धावांची नाबाद खेळी करन भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. 

इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज पाक संघातील तिघांना कोरोना; पुढे काय ऐकायला मिळणार?

भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार एलस्टर कूक अवघ्या दोन धाव करुन माघारी फिरला. आघाडीचे फलंदाजा स्वस्तात माघारी फिरल्यानंतर इयान मॉर्गन आण रवी बोपारा यांनी पाचव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी करत इंग्लंडच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या, दोघांनाही अनुक्रमे 33 आणि 30 धावांवर बाद करत ईशांत शर्माने सामन्याला कलाटणी दिली. ही जोडी तंबूत परतल्यानंतर तळाची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. निर्धारित 20 षटकात इंग्लंडला 8 बाद 124 धावांपर्यंतच मजल मारता आली. ही भारतीय संघाची दुसरी चॅम्पियशीप ट्रॉफी होती. यापूर्वी 2002 मध्ये भारत-श्रीलंका यांना संयुक्तरित्या विजेते घोषीत करण्यात आले होते.  


​ ​

संबंधित बातम्या