टाय-टाय फिनिश! षटकार-चौकाराच्या बेरजेनं ठरला होता विश्वविजेता

सुशांत जाधव
Tuesday, 14 July 2020

या सामन्यात थरार सुरु झाला होता तो इंग्लंडच्या डावातील शेवटच्या दोन षटकापासून. अखेरच्या दोन षटकात इंग्लंडला 24 धावांची गरज होती. स्टोक्सनं मैदानात जम बसवला होता. प्रत्येक चेंडूवर सामन्याला कलाटणी मिळत असल्याचा अनुभव क्रिकेट चाहत्यांनी घेतला.  

पुणे : 2019 च्या विश्वषकात यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला अंतिम सामन्यातील रंगत क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदाच अनुभवायला मिळाली. टाय सुपर ओव्हर्सचा थरार अन् षटकार-चौकाराच्या गणितानं लागलेला निकाल हे सर्व क्रिकेट चाहत्यांनी एकाचवेळी अनुभवलं होतं. 14-07-2019 हा दिवस क्रिकेट चाहता कदाचित कधीच विसरणार नाही. या दिवशी झालेला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यासारखा सामना पुन्हा होणे नाही. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 बाद 242 धावा केल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पण अष्टपैलू बेन स्टोक्सने संघाला सामन्यात आणले. हातून निसटलेला सामना त्याने इंग्लंडच्या बाजूनं वळवला होता.

भारतीय युवा जोश अन् अनुभवी गड्याची एकत्र नेट प्रॅक्टिस; पाहा व्हिडिओ

या सामन्यात थरार सुरु झाला होता तो इंग्लंडच्या डावातील शेवटच्या दोन षटकापासून. अखेरच्या दोन षटकात इंग्लंडला 24 धावांची गरज होती. स्टोक्सनं मैदानात जम बसवला होता. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सननं शेवटच्या क्षणी निशम आणि बोल्टच्या खांद्यावर विश्वास दाखवला. निशमने दोन विकेट घेत यजमानांना अडचणीत आणले. पण या षटकात स्टोक्सनं लगावलेल्या षटकारानं सामन्यात पुन्हा वळण आले. अखेरच्या षटकात इंग्लंडला 15 धावांची गरज होती. एका बाजूनं स्टोक्स खिंड लढवत होता. इंग्लंडच्या हातात दोन विकेट्स होत्या अन् चेंडू बोल्टच्या हातात होता. स्ट्राइकवर असलेल्या बेन स्टोक्सने या षटकातील पहिले दोन चेंडू निर्धाव खेळले. 4 चेंडूत 15 धावा सामना पुन्हा न्यूझीलंडच्या बाजूने झुकला. पण तिसऱ्या आणि चौथ्या चेंडवूर सलग दोन षटकार खेचत स्टोक्सने सर्वांच्या भुवया उंचावल्या. आता सामना इंग्लंडच्या पारड्यात सहज जाईल हे वाटू लागले. 2 चेंडूत 3 धावा असताना राशीद दुहेरी धाव घेताना धावबाद झाला. एका चेंडूत दोन धावा अशी परिस्थिती निर्माण झाली. 1 चेंडू 1 विकेट आणि जिंकण्यासाठी दोन धावा असताना स्टाईक पुन्हा स्टोक्सकडे होते. त्याने चेंडू टोलवलाही पण पुन्हा दुहेर धाव घेतना इंग्लंडने विकेट गमावली अन् सामना टाय झाला.

वेस्ट इंडिजच्या संघर्षमय विजयाने क्रिकेटमध्ये आली जान

आयसीसीच्या नियमाप्रमाणे सामन्याचा निकाल आता सुपर ओव्हरमध्ये लागणार होता. दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये स्टोक्स-बटलर जोडीला मैदानात पाठवले. न्यूझीलंडकडून बोल्टने षटक टाकलेय. या षटकात त्याने 15 धावा खर्च केल्या. या धावांचा पाठलाग करताना पुन्हा थरार रंगला. न्यूझीलंडच्या संघानेही 1 विकेट गमावून 16 धावा केल्या. अन् सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. सामन्यात सुपर ओव्हरमधील षटकार चौकारांशिवाय डावातील षटकार चौकारांच्या बेरजेचं गणितावरुन बाउंड्री काउंटच्या जोरावर इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले. सीमारेषेपलीकडे ज्या संघाने सर्वाधिक वेळा चेंडू टोलवला तो विजयी ठरला. (यात चौकार+षटकार) या नियमावरुन आयसीसीवर चांगलीच टीका झाली. त्यानंतर अखेर आयसीसीने हा नियमच रद्द केला आहे.  


​ ​

संबंधित बातम्या