शेन वॉर्नने सत्तावीस वर्षांपुर्वी आजच फेकला होता ‘बॉल ऑफ द सेंच्यूरी’..पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

शेन वॉर्नने 1993 साली इंग्लडविरुध्द खेळत असताना एशेज मालिकेत तो चेंडू फेकला होता.

क्रिकेटच्या इतिहासात महान फिरकीपटू म्हणून ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न याचे नाव कायम लक्षात ठेवले जाईल. शेन वॉर्नने सत्ताविस वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी फेकलेला एक चेंडू मात्र त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अमर झाला आहे. तो चेंडू ‘बॉल ऑफ द सेंच्यूरी’ म्हणून लक्षात ठेवण्यात आला आहे. शेन वॉर्नने 1993 साली इंग्लडविरुध्द खेळत असताना एशेज मालिकेत तो चेंडू फेकला तेव्हा त्याला क्रिकेट मध्ये जेमतेम वर्ष झाले होते. वॉर्नने 1992 साली भारताविरुध्द सिडनी कोसोटी सामन्यादरम्यान त्याने क्रिकेट करिअर सुरु केले होते. 

"Lords Honours च्या संघात केवळ एकच भारतीय, जाणून घ्या कोण आहे हा महारथी"

वॉर्नने फेकलेला तो चेंडूचा स्टंपपासून खूप बाहेरच्या बाजूला टप्पा झाला पण त्यानंतर तो वळून सरळ ऑफ स्टंपवरती येऊन आदळला त्यासोबतच तो इतिहासात नोंद झाला होता. तेव्हा पासून या चेंडूची चर्चा करण्यात येते. आज 4 जून या दिवशी त्या घटनेला सत्ताविस वर्ष पुर्ण झाली आहेत. मॅनचेस्टरच्या ऑल्ड ट्रैफर्ड मैदानावर झालेल्या या सामन्यामध्ये वॉर्नने त्याच्या जादूई चेंडूने इंग्लडचा फलंदाज माइक गेटिंगला बोल्ड केले होते. तो चेंडू जवळपास 90 डीग्रीच्या कोनात वळून स्टंपवर लागला होता. त्या सामन्यामध्ये वॉर्नने आठ विकेट घेतले होते, त्यासोबतच ऑस्ट्रेलियाने सामना आणि मालिका दोन्ही जींकली होती. 

 

 

ऑस्ट्रेलियीने या एशेज मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात 179 धावांनी विजय मिळवला होता. वार्न हा मॅन ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले होते. वॉर्नहा जगातील सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 145 कसोटी सामन्यामध्ये 708 विकेट मिळवल्या आहेत, त्यासोबतच 194 एकदिवसीय अंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 293 विकेट घेतल्या आहेत.
 


​ ​

संबंधित बातम्या