डेव्हिस कप डायरी : साउथ क्‍लब; विंबल्डन ऑफ ईस्ट 

मुकुंद पोतदार
Friday, 1 February 2019

शतक महोत्सवी वर्षात नव्या स्वरुपातील डेव्हिस करंडक स्पर्धेच्या पात्रता लढतीचे यजमानपद मिळाल्यामुळे सिटी ऑफ जॉयमधील टेनिसप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे.

कोलकाता हे बहुतेक क्षेत्रांत ऐतिहासिक संदर्भ असलेले शहर आहे. आधी मात्र ते खेडे होते, कालीकाता, कोलीकाता अशी नावे होती. तेव्हा बंगालची राजधानी मुर्शिदाबाद होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजांनी एंट्री केल्याचा ओझरता संदर्भ देऊन आता आपण मूळ विषयाकडे वळूयात. खेळाच्या संदर्भात ईडन गार्डन्स, सॉल्ट लेकच्या जोडीला साउथ क्‍लबचे ग्रास कोर्ट ही कोलकात्यातील सेंटर्स त्या-त्या भारतीय खेळांची पंढरी मानली जातात. 

साउथ क्‍लबची स्थापना 1820 मध्ये झाली. यंदा शतक महोत्सवी वर्षात प्रवेश करताना येथे डेव्हिस करंडक लढत होत आहे. कोलकातावासी क्रिकेटप्रेमी आणि फुटबॉलप्रेमी आहेतच, शिवाय त्यांचे टेनिसप्रेमसुद्धा सर्वश्रुत आहे. 1946 मध्ये पहिली राष्ट्रीय ग्रास कोर्ट टेनिस स्पर्धा येथे झाली. त्यात दिलीप बोस विजेते ठरले. टेनिसमध्ये हार्ड कोर्ट आणि ग्रॅफाईटच्या रॅकेट येण्यापूर्वी ग्रास कोर्ट आणि लाकडी रॅकेटचा जमाना होता. सर्व्ह अँड व्हॉलीचे शिलेदार नेत्रसुखद खेळ करायचे. केवळ साउथ क्‍लबने देशाला असंख्य टेनिसपटू आणि डेव्हिस कपर्स दिले. त्यामुळे साउथ क्‍लबला विंबल्डन ऑफ ईस्ट असे बिरुद बहाल करण्यात आले आहे. 

शतक महोत्सवी वर्षात नव्या स्वरुपातील डेव्हिस करंडक स्पर्धेच्या पात्रता लढतीचे यजमानपद मिळाल्यामुळे सिटी ऑफ जॉयमधील टेनिसप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे.


​ ​

संबंधित बातम्या