वॉर्नर, स्मिथच्या पुनरागमनामुळे क्‍लब क्रिकेटला गर्दी 

वृत्तसंस्था
Saturday, 22 September 2018

स्मिथला मिळालेला प्रतिसाद भावपूर्ण होता. चुका जरूर होतात, पण लोकही पटकन क्षमा करतात. सारे काही सुरळीत असल्याचे स्मिथला या पाठिंब्यावरून कळले असेल. 
- शेन वॉट्‌सन, सदरलॅंडचा खेळाडू 
 

सिडनी : डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव स्मिथ यांनी मायदेशातील क्‍लब क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. सिडनी ग्रेड क्रिकेटमध्ये त्यांचा खेळ पाहायला गर्दी झाली होती. वॉर्नरने विजयी शतकी खेळी केली, तर स्मिथने 85 धावा केल्या. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चेंडू कुरतडल्याप्रकरणी या दोघांवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. आयसीसी जागतिक क्रमवारीत स्मिथ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सदरलॅंडचे प्रतिनिधित्व केले. 92 चेंडूंत सहा चौकार व एका षटकारासह त्याने 85 धावा फटकावल्या. त्याच्या संघाने 238 धावा केल्या, पण प्रतिस्पर्धी मॉस्मन संघाने विजय मिळविला. स्मिथ 29 वर्षांचा आहे. तो कॅनडातील पहिल्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये टोरांटो नॅशनल्स संघाकडून खेळला होता. 

31 वर्षीय वॉर्नरने रॅंडविक-पीटरसॅम संघाकडून सेंट जॉर्जविरुद्ध नाबाद 155 धावा केल्या. त्याने 98 चेंडूंत शतक काढले. प्रतिस्पर्धी संघातील सहकारी कसोटीपटू जॉश हेझलवूड याने सांगितले की, "वॉर्नरने फार छान खेळ केला. तो अशा आव्हानात्मक परिस्थितीत उत्तम खेळ करतो. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. क्‍लब क्रिकेटला इतकी गर्दी होणे अप्रतिम आहे.' 

स्मिथला मिळालेला प्रतिसाद भावपूर्ण होता. चुका जरूर होतात, पण लोकही पटकन क्षमा करतात. सारे काही सुरळीत असल्याचे स्मिथला या पाठिंब्यावरून कळले असेल. 
- शेन वॉट्‌सन, सदरलॅंडचा खेळाडू 
 

संबंधित बातम्या