मी थकलोय, कदाचित आता निवृत्ती घेईन

वृत्तसंस्था
Monday, 2 December 2019

पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 335 धावांची खेळी करणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडणाऱ्या वॉर्नरने त्रिशतकानंतर त्याने निवृत्तीचा इशारा दिला. 

ऍडलेड : पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 335 धावांची खेळी करणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडणाऱ्या वॉर्नरने त्रिशतकानंतर त्याने निवृत्तीचा इशारा दिला. 

बाबांच्या मर्जीविरुद्ध क्रिकेट खेळला अन् आता टीम इंडियाचा कर्णधार झाला

त्याने पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडकानंतर ट्वेंटी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याचे सांगितले, म्हणजे त्याला कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करता येईल. 

Image result for david warner

ट्वेंटी20 विश्वकरंडकानंतर घेणार निवृत्ती 
ऍडलेड कसोटीच्या तिसऱ्या दिवसानंतर वॉर्नरने ट्वेंटी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करेन असे स्पष्ट केले. तो म्हणाला, ''माझ्यामते निवृत्तीवर मी विश्वकरंडकानंतरच विचार करेन. सहा महिन्यानंतर विश्वकरंडक खेळायचा आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये सध्या खूप चांगले युवा खेळाडू येत आहेत आणि त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे.''

अखेर टीम इंडिया सुटली; प्रसाद यांचा कालवधी संपला

त्याला जाणवतोय थकवा
वॉर्नर म्हणाला की मी थकव्यामुळे ट्वेंटी20 क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करत आहे. तो म्हणाला, ''जेव्हा तुम्ही कसोटी क्रिकेट खेळता तेव्हा तुमचे पाय थकतात. मी अजून हे ठरवलं नाहीये की मी कोणत्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार.''

 


​ ​

संबंधित बातम्या