धवनला पाहून डेव्हिड लॉईड यांनी केला भांगडा

वृत्तसंस्था
Saturday, 8 September 2018

शिखर धवन सीमारेषेजवळ उभा राहून भांगडा करत होता. ते पाहून समालोचन करत असलेला भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजनसिंग याने इंग्लंडचा माजी फलंदाज डेव्हिड लॉईड यांनाही भांगडा करायला शिकवला.   

ओव्हल : इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत इंग्लंडच्या सात फलंदाजांना बाद करत धाव फलकावर फक्त 198 धावा लागू दिल्या. दिवसाच्या शेवटाला साऱ्यांच्यांच चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मात्र, शिखर धवन सीमारेषेजवळ उभा राहून भांगडा करत होता. ते पाहून समालोचन करत असलेला भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजनसिंग याने इंग्लंडचा माजी फलंदाज डेव्हिड लॉईड यांनाही भांगडा करायला शिकवला.   

अखेरच्या सामन्यचा पहिला दिवस भारतासाठी अवघड दिसत होता. अॅलिस्टर कुकच्या 71 धावांमुळे इंग्लंडने पहिल्या दिवसावर चांगली पकड घेतली असतानाच भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत इंग्लंडची सात बाद 198 अशी अवस्था केली. त्यामुळे दिवसाचा खेळ संपत आल्यावर सर्व भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यातच सीमारेषेजवळ उभा असलेल्या शिखर धवनने आपल्या नेहमीच्या शैलीत भांगडा करत आनंद साजरा केला. 

धवनचा भांगडा पाहून प्रेक्षकांमधील भारतीय चाहत्यांनीसुद्धा भांगडा केला. तसेच समोलचन करत असलेल्या हरभजनने आपला समलोचक साथीदार लॉईड यांनाही भांगडा करायला शिकवला आणि ते भांगड्यावर थिरकले सुद्धा.


​ ​

संबंधित बातम्या