IPL स्पर्धेदरम्यान वर्णभेद अनुभवला, या खेळाडूनं केला धक्कादायक खुलासा

टीम ई-सकाळ
Sunday, 7 June 2020

त्यावेळी मला या गोष्टीची फारशी कल्पना नव्हती पण आज मला राग अनावर होतोय, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.   

मुंबई :  देशाच्या क्रिकेट मंडळाकडून आवश्यक त्या बेसिक सुविधा मिळाल्या नसतानाही संघाला विश्ववेजेता ठरवणाऱ्या डेरन सॅमीने वर्णभेदाच्या मुद्यावर मोठा खुलासा केलाय. भारतीय मैदानात रंगणाऱ्या लोकप्रिय आयपीएल स्पर्धेदरम्यान माझ्यासह श्रीलंकन थिसारा परेरा याला वर्णभेदाचा सामना करावा लागला होता, असे सॅमीने म्हटले आहे. त्यावेळी मला या गोष्टीची फारशी कल्पना नव्हती पण आज मला राग अनावर होतोय, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.   

#वर्णभेदाचा_खेळ : 'त्या' प्रकरणानंतर म्हणे सायमंड नशेच्या आहारी गेला

अमेरिकेत आफ्रिकन वंशाच्या जॉर्ज फ्लॉयडचा दुर्देवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर वर्णभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींसह क्रिडा क्षेत्रातील मंडळी या घटनेचा निषेध करत आहेत. यापूर्वी वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने वर्णभेदाच्या मुद्यावर भाष्य केले होते. वर्णावरुन भेदभाव हा केवळ फुटबॉलच्या मैदानातच नव्हे तर क्रिकेटच्या मैदानातही होतो, असे त्याने म्हटले होते. 

सारे मिळून भेकडवृत्तीला संपवूया! त्या घटनेवर 'विराट' प्रतिक्रिया

त्यानंतर आता डॅरेन सॅमीने इंन्स्टाग्राम अकाउंटवरुन यासंदर्भातील आपला भयावह अनुभव शेअर केलाय. सॅमीने पोस्टमध्ये लिहिलंय की, 'सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असताना मला आणि  थिसारा परेराला 'काळू' असे बोलवले जायचे. त्यावेळी मला वाटायचे की याचा अर्थ एखादा मजबूत घोडा वैगेरे असावा. आता मला त्याचा अर्थ समजतो. त्या गोष्टीचा मला प्रचंड रागही यतोय. सध्याच्या घडीला सॅमीने वर्णभेदाच्या विरोधात एक मोहिम सुरु केली आहे. त्याच्या या मोहिमेला प्रचंड प्रतिसादही मिळताना दिसतोय.  


​ ​

संबंधित बातम्या