विराटला ही महिला क्रिकेटपटू म्हणाली 'रनमशिन'

वृत्तसंस्था
Sunday, 2 September 2018

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅटचा विराट कोहलीबद्दल असलेला जिव्हाळा सर्वश्रूत आहे. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीची फलंदाजी पाहून वॅटने त्याला 'रनमशिन' असे म्हटले आहे. 

लंडन : इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅटचा विराट कोहलीबद्दल असलेला जिव्हाळा सर्वश्रूत आहे. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीची फलंदाजी पाहून वॅटने त्याला 'रनमशिन' असे म्हटले आहे. 

डॅनियल वॅट तिने विराटने घातलेल्या लग्नाच्या मागणीमुळे फारच प्रसिद्ध आहे. त्यातच आता तिने पुन्हा कोहलीवर स्तुतिसुमने उधळली आहेत. विराट कोहलीने चौथ्या सामन्यादरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पा पार केला. त्याने  119 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. सर्वात कमी डावांमध्ये अशी कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर आहे. 

त्याच्या याच कामगिरीचे कौतुक करताना विराटच्या एका चाहत्याने त्याचा फोटो शेअर करत वॅटला यावर प्रतिक्रिया करण्याची विनंती केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना वॅटने कोहलीला रनमशिन म्हटले आहे. विराट कोहलीने पहिल्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात शतके झळकाविली असून, या मालिकेत आतापर्यंत भारताकडून त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत


​ ​

संबंधित बातम्या