बांग्लादेशातील सहकाऱ्यांच्या पगारासाठी डॅनिअल व्हिटोरीने केली मोठी मदत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

डेनिअल व्हिटोरी याने अशाच प्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे.

कोरोना व्हायरसने संपुर्ण जगाला विळखा घातला आहे, जगभरात लाखो लोक या माहामारीमुळे अडचणीत सापडले आहेत. क्रीडा क्षेत्राला देखील याचा मोठा फटका बसला आहे. क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज खेळाडू पिडीत लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. न्यूझिलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बांग्लादेश क्रिकेट संघाचा स्पिन गोलंदाजी प्रशिक्षक डेनियल व्हिटोरी याने अशाच प्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा संघटना कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असल्याने या संघटना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात करत असताना दिसत आहेत. अशा काळात व्हिटोरीने त्याच्या पगाराचा एक हिस्सा बांग्लादेश क्रिकेट बोर्डच्या त्याच्यापेक्षा कमी पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात यावा असे सांगीतले आहे. त्याने तशा सुचना कर्मचाऱ्यांना केल्या आहेत अशी बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (बीसीसी) चे सिईओ निजामुद्दीन चौधरी यांनी माहिती दिली आहे. 

पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाह म्हणतो, “मी विराट कोहलीला घाबरत नाही पण..”

"व्हिटोरी ने सांगीतले की आपल्या सगळ्यांनी पगारातील एक हिस्सा निश्चीतपणे बीसीबी मध्ये कमी पगार कमावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे आणि या बद्दल क्रिकेट संचालन समितीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.” अशी माहिती चौधरी यांनी दिली. व्हिटोरी पगारातील किती रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला आहे ते सांगण्यात आलेले नाही. पण 41 वर्षीय व्हिटोरी हा बांग्लादेश संघाच्या प्रशिक्षकांमधील सर्वाधिक पगार कमवणारा सदस्य असल्याने त्यांनी केलेल्या शंभर दिवसांसाठीच्या कराराअंतर्गत 2 लाख 50 हजार डॉलर इतकी रक्कम देण्यात येते. व्हिटोरी याचा करार या वर्षी होणाऱ्या टि-20 विश्वचषकापर्यंत आहे. 


​ ​

संबंधित बातम्या