भारतीय प्रेक्षकांच्या भीतीने ग्वाल्हेरमध्ये पंचांनी सचिनला नाबाद ठरवले!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

सचिनने या सामन्यामध्ये नाबाद 200  धावा केल्या आणि त्याच्या अंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर मधील पहिले दुहीरी शतक नावावर केले होते.

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने खळबळजनक दावा खेला आहे, स्टेनने अंपायर इयान गोल्ड यांनी 2010 साली भारतीय प्रेक्षकांच्या प्रतिक्रीयेच्या भितीने सचिन तेंडूलकर याला मुद्दाब बाद दिले नाही असा गौप्यस्फोट केला आहे. सचिन त्याच्या पहिल्या दुहेरी शतकाच्या जवळ पोहचला होता त्यामुळे त्याला नाबाद ठरवण्यात आल्याचे त्यांने सांगीतले आहे. 

स्टेन म्हणाला की, ‘सचिन त्याच्या दुहेरी शतकापासून दहा धावा दूर होता तेव्हा एलबीडब्लू पध्दतीने मी त्याला बाद केले होते पण मैदानावर असलेल्या गोल्ड यांनी त्याला आउट दिले नाही.’ स्टेन इंग्लडचा वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन स्काईपच्या माध्यमातून केलेल्या पॉडकास्ट दरम्यान ही माहीती दिली तो म्हणाला की, “ सचिनने ग्वाल्हेर मध्ये झालेल्या वनडे सामन्यात पहिले दुहेरी शतक केले होते, मला चांगले आठवते की तो 190 धावांच्या जवळपास खेळत होता तेव्हा मी त्याला बाद केले होते.” त्यानंतर स्टेनने अंपायरला सचिनला आउट न देण्याबद्दल इयान गोल्ड यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगीतले की चौफेर एकदा बघ जर मी सचिनला बाद दिले तर मी हॉटेल मध्ये वापस जाऊ शकणार नाही, असे उत्तर मिळाल्याचे स्टेनने यावेळी सांगीतले.

"लॉकडाऊनमध्ये क्रीडा मैदाने खुली करण्यास केंद्र सरकारची परवानगी"

सचिनने या सामन्यामध्ये नाबाद 200  धावा केल्या आणि त्याच्या अंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर मधील पहिले दुहीरी शतक नावावर केले होते. सचिनच्या नाबाद 200 धावांच्या मदतीने भारताने त्या सामन्यामध्ये तीन विकेट गमावत 403 धावांचा डोंगर उभा केला होता. त्याचा पाठलाग करतान दक्षिण आफ्रिकेचा संघ 42.5 षटकांमध्ये 248 धावा करु शकला आणि भारताने तो सामना 153 धावांच्या फरकाने जिंकला. 
 


​ ​

संबंधित बातम्या