पापा बनूनही अजिंक्य सदैव असेल विद्यार्थीच

मुकुंद पोतदार
Tuesday, 8 October 2019

रंगात रंगून रंग माझा वेगळा अशी अजिंक्य रहाणेची ओळख आहे. जंटलमन्स गेम अशी क्रिकेटच्या खेळाची प्रतिमा जी थोडी-फार टिकून आहे त्याचे श्रेय अजिंक्यसारख्या खेळाडूंना जाते. मितभाषी असूनही स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविलेल्या, फुलविलेल्या अजिंक्यचे पैलू त्याच्या मोजक्‍या विधानांमधून उलगडत असतात. डोंबिवलीकर अजिंक्‍य हा एक विद्यार्थी आहे. तो सतत शिकण्याच्या भूमिकेत असतो. तो कदापी हवेत जात नाही. दुसरीकडे तो हजरजबाबी आहे. तो प्रसंगनिष्ठ विनोद करू शकतो. अशा या अजिंक्‍यचे विद्यार्थ्याचे पैलू पापा बनल्यानंतरही उलगडले. 

रंगात रंगून रंग माझा वेगळा अशी अजिंक्य रहाणेची ओळख आहे. जंटलमन्स गेम अशी क्रिकेटच्या खेळाची प्रतिमा जी थोडी-फार टिकून आहे त्याचे श्रेय अजिंक्यसारख्या खेळाडूंना जाते. मितभाषी असूनही स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविलेल्या, फुलविलेल्या अजिंक्यचे पैलू त्याच्या मोजक्‍या विधानांमधून उलगडत असतात. डोंबिवलीकर अजिंक्‍य हा एक विद्यार्थी आहे. तो सतत शिकण्याच्या भूमिकेत असतो. तो कदापी हवेत जात नाही. दुसरीकडे तो हजरजबाबी आहे. तो प्रसंगनिष्ठ विनोद करू शकतो. अशा या अजिंक्‍यचे विद्यार्थ्याचे पैलू पापा बनल्यानंतरही उलगडले. 

शाळेपासूनची मैत्रीण राधिका हिच्याशी अजिंक्‍य 2014 मध्ये विवाहबद्ध झाला. विशेष म्हणजे हा विवाह दोघांच्या पालकांनी ठरविला होता. महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रोहित शर्मा अशा समकालीन सहकाऱ्यांप्रमाणे अजिंक्‍य हा सुद्धा कन्येचा पिता झाला. नवरात्रीदरम्यान कन्यारत्नप्राप्ती झाली तेव्हा अजिंक्‍य विशाखापट्टणमला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी खेळत होता. संघाचा विजय रविवारी साकार झाल्यानंतर अजिंक्‍य कन्येला पाहण्यासाठी मुंबईला धावला. त्या क्षणाचा फोटो त्याने ट्‌वीटरवर पोस्ट केला. त्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अजिंक्‍य-राधिकाचे अभिनंदन केले. 

यात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे ट्‌वीट भावपूर्ण ठरले. सचिनने म्हटले आहे की, राधिका-अजिंक्‍य, तुमचे अभिनंदन. पहिल्या अपत्याचे पालक बनण्याचा आनंद अतुलनीय असतो. त्याचा पुरेपूर आनंद लुटा. डायपर बदलण्यासाठी नाईटवॉचमनची भूमिका बजावण्याच्या नव्या भूमिकेचा आनंद लुटा. 

त्यावर अजिंक्‍यने लगेच आभार मानले आणि तो म्हणाला की, आता थोड्या टिप्स घेण्यासाठी लवकरच तुझी भेट घेतो. 

 

अजिंक्‍यसाठी क्रिकेटपटू म्हणून सचिनच्या टिप्स नेहमीच बहुमोल ठरल्या आहेत. मुख्य म्हणजे सचिनने ज्या भारतीय खेळाडूंची अगदी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे त्यात अजिंक्‍यचा नंबर पहिला आहे. याचे कारण सचिनला एक व्यक्ती-विद्यार्थी म्हणून अजिंक्‍य आवडतो. 

या दोघांमधील हाच भावबंध नेहमी प्रकट होत असतो. अगदी अलीकडच्या उदाहरणापासून सुरवात करूयात. निमित्त होते सचिनच्या बर्थडेचे अर्थात 24 एप्रिलचे. त्यादिवशी अजिंक्‍यने ट्‌वीटरवर एक फोटो पोस्ट केला होता. सचिन बॅटचे निरीक्षण करीत असून अजिंक्‍य तन्मयतेने ते पाहात-ऐकत असल्याचा हा फोटो आहे. सचिनला शुभेच्छा देताना अजिंक्‍यने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती. त्याने म्हटले होते की, तुम्हाला जीवनात पुढे घेऊन जातो तो तुमचा दृष्टिकोन. तू दिलेला हा बहुमोल सल्ला मी कदापी विसरणार नाही. हॅपी बर्थडे असे म्हणत अजिंक्‍यने सचिनचा Sir असा उल्लेख केला होता. 

 

 

यावरून अजिंक्‍य हा स्वतःला सचिनचा विद्यार्थी मानतो हे स्पष्ट होते. सचिनने मग यास उत्तर देताना म्हटले होते की, धन्यवाद अजिंक्‍य. तू जसा आहेस तसाच राहा. तुला भविष्यासाठी भरपूर शुभेच्छा. 

गेल्या वर्षी अजिंक्‍यच्या बर्थडेनिमित्तही या दोघांतील सर-विद्यार्थ्याचे नाते दिसले होते. सहा जून रोजी सचिनने ट्‌वीटरवर तो आणि अजिंक्‍य मुंबईसाठी खेळतानाचा फोटो पोस्ट केला होता. त्याने म्हटले होते की, माझ्या पाहण्यात आलेला एका सर्वाधिक मेहनती, शिस्तबद्ध आणि सिन्सीयर क्रिकेटपटूला हॅपी बर्थडे. तुझ्यासाठी हे वर्ष सुंदर ठरावे. माझ्या शुभेच्छा नेहमीच आहेत. 

अजिंक्‍यने त्यावेळी सचिनचे आभार मानले होते आणि ते सुद्धा अगदी मनापासून. माझा दिवस सार्थकी लावल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही असतात. तू माझे प्रेरणास्थान आहेस. माझ्या क्रिकेट मूल्यांच्या जडणघडणीमध्ये तू महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

बॅड पॅचच्या वेळी सल्ला 

 

Image may contain: 2 people, people playing sport and people standing

सचिनच्या शुभेच्छांबरोबरच त्याचा सल्ला सुद्धा अजिंक्‍यसाठी मोलाचा असतो. 2017 मध्ये अजिंक्‍यचा बॅड पॅच लांबला होता. त्याने झटपट क्रिकेटसाठी संघातील स्थान गमावले होते. त्यावेळी प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) नेटप्रॅक्‍टीस केली होती. त्यावेळी सचिनशी भेट झाली होती. सचिनने काय टिप्स दिल्या, याविषयी अजिंक्‍य म्हणाला होता की, आम्ही भेटलो. त्यावेळी सचिन म्हणाला की, तुझ्या खेळावर पक्का विश्वास ठेव. कधी तुला संधी मिळतील, तर कधी मिळणार नाहीत. तुझ्या हातात जे आहे ते म्हणजे पूर्वतयारी. तुझा दृष्टिकोन योग्य असला पाहिजे. सचिन माझ्या तंत्राबद्दल काहीही बोलला नाही, केवळ मानसिकतेविषयी त्याने संवाद साधला. 

"सेंडॉफ' कसोटीत सर्टिफिकेट 

अशा या सचिनने 2013 मध्येच अजिंक्‍यला सर्टिफिकेट दिले होते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील "सेंडॉफ' कसोटीच्यावेळी त्याने अजिंक्‍यशी संवाद साधला होता. त्याविषयी एका मुलाखतीत अजिंक्‍यने सांगितले होते. दृष्टिकोन हेच तुमचे सर्वांत मोठे बलस्थान असते, असे सांगून सचिन मला म्हणाला होता की, तो मला कारकिर्दीच्या सुरवातीपासून बघत आहे. अनेकांकडे कौशल्य असते, पण दृष्टिकोन दुर्मिळ असतो, जो तुम्हाला सर्व प्रकारच्या परिस्थितीत (अनुकूल असो वा प्रतिकूल) प्रेरित ठेवतो. 

सतत शिकण्याचाच दृष्टिकोन 

अजिंक्‍यचा दृष्टिकोन सतत शिकण्याचा असतो. वेस्ट इंडिज दौऱ्यात कसोटी शतकाची प्रतीक्षा संपुष्टात आणून त्याने चाहत्यांना आनंदित केले. विशाखापट्टणममधील कसोटीपूर्वी अजिंक्‍य म्हणाला होता की, प्रत्येक कसोटी तुम्हाला काही तरी शिकविते. मला पहिल्या संधीसाठी 17 आणि मग बॅड पॅचनंतर पुढील शतकासाठी 17 कसोटी प्रतीक्षा करावी लागली. या कालावधीत खूप काही शिकू शकलो. 

असा हा आपलासा वाटणारा आणि आपलासा करणारा अजिंक्‍य पापा बनला तरी विद्यार्थी आणि तो सुद्धा सिन्सीयर विद्यार्थीच राहणार आहे. त्याच्यासाठी कन्येचा पायगुण फॉर्मच्यादृष्टिने फलदायी ठरो हीच सदिच्छा. 
 


​ ​

संबंधित बातम्या