Pro Kabaddi : संघर्षपूर्ण लढतीत दबंग दिल्लीची एका गुणाने सरशी 

वृत्तसंस्था
Wednesday, 24 July 2019

प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमाच्या चौथ्या दिवशी संघांचे परस्परविरोधी विजय बघायला मिळाले. पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने यूपी योद्धा संघावर 48-17 असे एकतर्फी वर्चस्व राखले; तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली दंबगला तेलुगू टायटन्स संघाने झुंजवले. दिल्लीला अवघ्या एका गुणाने विजय मिळविता आला. तेलुगू संघाचा हा तिसरा पराभव होता.

प्रो-कबड्डी
हैदराबाद ः प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमाच्या चौथ्या दिवशी संघांचे परस्परविरोधी विजय बघायला मिळाले. पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने यूपी योद्धा संघावर 48-17 असे एकतर्फी वर्चस्व राखले; तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली दंबगला तेलुगू टायटन्स संघाने झुंजवले. दिल्लीला अवघ्या एका गुणाने विजय मिळविता आला. तेलुगू संघाचा हा तिसरा पराभव होता.

तेलुगू संघाकडून आज महाराष्ट्राचे सूरज आणि सिद्धार्थ देसाई बंधू एकत्र खेळले. दोन्ही भावांत मोठ्याने दंबगगिरी दाखवली; पण छोट्यास अजून लय गवसली नाही. सूरजच्या तुफानी खेळाने तेलुगूने विजयाला गवसणी घातली होती, पण निर्णायक क्षणी त्याला बाहेर बसवण्याचा निर्णय अनाकलनीय ठरला. दिल्लीने याचा फायदा उठवून एका गुणाने सरशी साधली. सूरजने 15 लढतींत 18 गुणांची नोंद केली. सिद्धार्थला 8 गुण मिळवता आले. पकडीत विशाल भारद्वाज चमकला; पण दिल्लीच्या संयमाने त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. दिल्लीकडून नवीनकुमारने 14, तर चंद्रन रणजितने 6 गुणांची कमाई केली. चढाई आणि पकडीच्या खेळात फारसा फरक नसला, तरी दिल्लीने नोंदविलेला सामन्यातील एकमात्र लोण त्यांच्या विजयात निर्णायक ठरला. 

बंगालचे वर्चस्व 
गतमोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवत मोठी भरारी घेणाऱ्या यूपी योद्धाला सातव्या मोसमात सलामीलाच मोठा पराभव सहन करावा लागला. बंगाल वॉरियर्सने 48-17 अशा फरकाने हा सामना जिंकला. 

प्रो-कबड्डीच्या इतिहासात दोन वर्षांपूर्वी सर्वांधिक बोली लागलेला मोनू गोयत यंदा यूपीमधून खेळत आहे; पण आजच्या सलामीत तो प्रभावहीन ठरला. त्याचवेळी बंगालचा हुकमी खेळाडू मनिंदर सिंगने नऊ गुण मिळवले असले, तरी त्यांच्या संघातील इराणच्या महंमद नबीबक्षने सुपर टेनची कामगिरी बजावली. 

यूपी योद्धाचा संघ भरवशाचा खेळाडू रिशांक देवाडिगाच्या अनुपस्थितीत मैदानात उतरला होता, त्यामुळे चढाईची सर्व जबाबदारी मोनू गोयतवर होती. त्याचबरोबर गतमोसमात गाजवणारी बचावटू नितीश कुमारला पकडींमध्ये अवघे तीनच गुण मिळवता आले. त्यामुळे यूपीचा संघ आक्रमण आणि बचाव या दोन्ही पातळ्यांवर कमकुवत ठरला. त्यांना चार लोण स्वीकारावे लागले.


​ ​

संबंधित बातम्या